शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘तुझं आयुष्य उध्वस्त करेन’ पोलीस निरीक्षकावर आरोप करत हवालदार बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:33 IST

इंदापूर पोलिस ठाण्यात दिली असून पतीला न्याय न मिळाल्यास मुलांसह पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या करण्याचा इशाराही पत्नीने दिली आहे

इंदापूर : पोलिस निरीक्षकांने जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर पोलिस हवलदार बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी (दि.१०) उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित हवलदाराच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची फिर्याद इंदापूर पोलिस ठाण्यात दिली असून पतीला न्याय न मिळाल्यास मुलांसह पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या करण्याचा इशाराही पत्नीने दिली आहे.विष्णू सुभाष केमदारणे (वय ३९, सध्या रा. इंदापूर पोलिस ठाणे वसाहत, मूळ रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे बेपत्ता झालेल्या हवालदारांचे नाव आहे. त्यांची पत्नी प्रियंका केमदारणे यांनी तेबेपत्ता झाल्याची खबर पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी हवालदाराने आपल्या पत्नीच्या नावे लिहिलेली चिठ्ठी व पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या कथित धमकीचे कॉल रेकॉर्डही व्हायरल झाले आहे. सोमवारी (दि.९) रात्री साडेदहा ते मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आपला पती बेपत्ता झाल्याचेप्रियंका यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठांशी बोलल्यानंतर त्यांच्या परवानगीने आपण भाष्य करू, अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली आहे. प्रियंका केमदारणे म्हणाल्या की, आपण सकाळी झोपेतून उठायच्या आधीपासून आपले पती घरी नाहीत. ते सकाळी झोपेतून उठल्यानंतर क्रिकेट खेळण्यासाठी जातात. आठ वाजून गेल्यानंतर मी त्यांच्या सर्व मित्रांकडे चौकशी केली.

साडेआठ वाजता माझा मोबाइल बघितला. त्यावेळी आपल्या पतीने मोबाइलवर रेकॉर्डिंग व चिठ्ठी पाठवल्याचे दिसले. तीच चिठ्ठी नंतर घरातील ड्रॉवरमध्ये आढळली. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, विनोद रासकर व सूर्यवंशी यांची नावे या चिठ्ठीत होती. त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली, असे चिठ्ठीत लिहिले होते, अशी माहिती प्रियंका यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी