शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मला ४ लाखांच्या आसपास मतं मिळतील अन् जिंकणारा उमेदवार २५ हजारच्या लीडने निवडून येईल - वसंत मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 17:12 IST

मी २० वर्षे मनसेत असताना राज साहेबांनी खूप प्रेम दिले पण पक्षातील काहींनी माझे पाय खेचले

पुणे : पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडूनवसंत मोरे हे लोकसभेचच्या रणधुमाळीत होते. गेल्या दीड महिन्यापासून पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्या बरोबरच अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या सभा पुण्यात झाल्या. ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. अखेर १३ मेला मतदान झाले. आता पुणेकरांनी ठरवलेला खासदार बंद पेटीत आहे. येत्या  ४ जूनला तो ठरणार आहे. यावेळी मतदानालाही दिलासादायक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यादरम्यान शरद पवार गटाचे अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षीप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतर उमेदवारांच्या वाडेश्वर कट्ट्याचे आयोजन केले होते. यावेळी वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर उपस्थित होते. त्यांनी दीड महिन्यातील अनुभव इडली चटणी, शिऱ्याचा आस्वाद घेत सांगितले. त्यावेळी वसंत मोरेंनी मला ४ लाखांच्या आसपास मत मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. 

मोरे म्हणाले, मी स्थानिक आणि विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवली. शहरात शेवटच्या भागापर्यंत जाऊन मी प्रचार केला आहे. पक्षानेही मला साथ दिली आणि माझ्या पाठीशी उभा राहिला. अनेक ठिकाणी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. माझ्याही या निवडणुकीत अनेक आठवणी आहेत. पण यावेळी मतदानाची टक्केवारी लक्षात घेतल्यावर मला ४ लाखांच्या आसपास मत मिळतील. जो कोणी उमदेवार जिंकेल तो किमान २० ते २५ हजारच्या लीडने निवडून येण्याची शक्यता आहे.

दोघे ही वेगळ्या पक्षात करत आहात, त्या पक्षातील अनुभवांबाबत वसंत मोरे यांनी सांगितले की, मी २० वर्षे मनसेत असताना राज ठाकरे साहेबांनी खूप प्रेम दिले. पण पक्षातील काहींनी कधीच प्रेम न देता फक्त पाय ओढण्याचे केले. भविष्यात प्रत्येकाचा हिशोब होणार असल्याचा हर्ष मोरे यांनी यावेळी दिला. तर आता मी वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन महिना झाला असताना मला कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी खूप प्रेम दिले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.  

टॅग्स :pune-pcपुणेVasant Moreवसंत मोरेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४