शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 00:36 IST

...यावेळी, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा वजा सूचना देत, धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वक्तव्याचा संपूर्ण किस्सा जसाच्या तसा सांगितला. तसेच, जनतेला भावनिक न होण्याचे आवाहनही केले.  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभारता सर्वच राजकीय पक्षांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. मात्र सर्वांचे लक्ष आहे ते बारामतीकडे. आज बारामती जिल्ह्यातील शिर्सुफळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका प्रचारसभेत राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबरदस्त बॅटिंग केली. यावेळी, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा वजा सूचना देत, धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वक्तव्याचा संपूर्ण किस्सा जसाच्या तसा सांगितला. तसेच, जनतेला भावनिक न होण्याचे आवाहनही केले.  

आपला धरणासंदर्भातील 'तो' किस्सा सांगताना अजित दादा म्हणाले, "मी असंच त्या निंबोडीमध्ये एका बैठकीत, कॅमेरा नव्हता काही नव्हतं, सहज आपल्या भाषेत बोलायला गेलो, काय आता तिथं काय करावं का? धरणात... माझं वाटोळं झालं. परत कानाला खडाच लावला. कॅमेरा असो, नसो, सारखं मेंदूला सांगत असतो, नीट बोलायचं... नीट बोलायचं... नीट बोलायचं... शब्द कुठला चुकीचा जाऊ द्यायचा नाही... जाऊ द्यायचा नाही... जाऊ द्यायचा नाही... मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही... द्यायचा नाही... द्यायचा नाही..."

पुढे बोलताना अजित दादा म्हणाले, "माणूस चुकतो ना, अरे जो काम करतो तोच चुकतो. जो बोलतो... मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला. परंतु कायम गेला नही. त्याकरता माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे, आत्ता साहेब उभे नाहीत, मीही उभा नाही. आम्ही दोघेही नाही. त्यामुळे आता तुमच्या घरात 40 वर्षांपूर्वी आलेल्या सूनेला निवडून द्यायचं की, मुलीला द्यायचं, हे ठरवा तुम्ही. त्यामध्ये सुनेला मान असतो. सून लक्ष्मी म्हणून समजतात. अहो तुमच्या आमच्या घरात सून आली की, थोड्या दिवसाने सासू तिच्याच हातात चाव्या देते ना. सर्व तू आता बघ, चूकलं तर ती सुनेला सांगते, हे चूकलंय, हे दुरुस्त कर. आईच्या पोटातून तर कुणीच शिकून येत नाही. मीही नाही आलो. मी 1984 ला भाषणं करायचो, पाय लटलट कापायचे. कुणी तरी सांगायचं तिकडे बघून भाषण कर.. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे भावनिक होऊ नका." 

एकाचं कुंकू लावा... माझं तरी लावा नाही तर त्यांचं तरी लावा... -"काही जण दादा आले की, दादांच्या पुढे पण, हालगी वाजत असती, फटाके वाजत असतात. माझ्याही पुढे चालतात दादांना दिसावे, असे चालतात. दादांची पाठ फीरली आणि आमचे दुसरे आले की, त्यांच्यासोबत. अरे काय चाललंय तुमचं. एकाचं कुंकू लावा. माझं तरी लावा नाही तर त्यांचं तरी लावा. हा काय लावला चाहाटळपणा, हे झाकून राहत नाही," असा इशारा देत दादांनी धरणाचा किस्सा सांगितला.

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ -"आज परिस्थिती बदलली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जर तुमच्याकडे फक्त राज्याचाच निधी येणार असेल केंद्राचा निधी येणारच नसेल तर विकास कसा होणार. जर विरोधातील खासदार असेल तर निधी मिळत नाही. अनेक मोठ्या प्रकल्पांना मार्गी लावताना केंद्राची मदत घ्यावीच लागते. त्या साठी महायुतीच्या विचाराचा खासदार व्हायला हवा, असे पवार म्हणाले.

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Ajit Pawarअजित पवारElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४