शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 20:08 IST

लक्ष्मण माने यांनी बंचित बहुजन आघाडीतून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमाेर आपली भूमिका स्पष्ट केली.

पुणे : पक्षाच्या संस्थापक सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे. तसेच पक्षात आरएसएसचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षाच्या कामाकाजात हाेत असल्याचे निष्पन्न हाेत असल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी केला. पक्षात घुसमट हाेत असल्याने मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील माने यांनी पुण्यात माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. 

संभाजी भिडे यांचे धारकरी असलेल्या तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाढलेल्या गाेपीचंद पडळकर यांना लाेकसभेचे तिकीट दिले. आता तर पक्षाचे महासचिव पद व पक्ष प्रवक्ते पद पडळकर यांना देण्यात आले. तसेच डाॅ. ए. आर. अंजारिया हे आर.एस.एसचे मुस्लिम समाजातील हस्तक व भाजपाचे मुस्लिम आघाडीचे नेते यांना पक्ष संघटनेच्या कार्यकारणीत घेतले. यावरुन आर.एस.एसचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षाच्या कामकाजात झाल्याचे निष्पन्न हाेत आहे. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माने यांनी केली. तसेच आपण पक्षाच्या सदसत्वाचा आणि पार्लमेंट्री बाेर्डाच्या सदसत्वाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

माने म्हणाले, आरएसएसचा प्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षामध्ये दिसून येत आहे. आरएसएसमध्ये वाढलेल्या गाेपीचंद पडळकर यांना लाेकसभेची उमेदवारी देण्यात आली तसेच त्यांना पक्षाचे महासचिव पद देखील देण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यशैलीबाबत माझे मतभेद आहेत. आंबेडकरांसारखी माझी कार्यपद्धती नाही. माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्हाला बेरजेचं राजकारण करायचं आहे.  प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत, त्यांच्याबद्दल मी काही वाईट बाेलणार नाही. परंतु आम्ही एकत्र काम करणं शक्य नाही. लाेकसभेचे सर्व उमेदवार आंबेडकरांनी स्वतःच निवडले. लाेकसभेला आमचे निर्णय चुकले. काॅंग्रेससाेबत आघाडी केली असती तर आमच्या तीन ते चार जागा आल्या असत्या. परंतु लाेकसभेच्या पराभवाची जबाबदारी मी आंबेडकरांवर टाकत नाही. ती आम्ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यावेळी मला काही बाेलता आले नाही कारण मी पक्षाच्या चाैकटीत हाेताे. आता मी हे सांगताेय कारण मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. 

मी आता पक्षातून बाहेर पडलाेय. त्यामुळे मी स्वतंत्र वाट निवडणार. भाजप शिवसेनेला मदत हाेईल असे काही करणार नाही. आम्हा वंचितांना सत्तेत जायचे आहे. आंबेडकरांकडे जाऊन देखील सत्तेत जाणार नसू तर आम्ही आमची स्वतंत्र वाट निवडू. यासाठी विधानसभेसाठी काॅंग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करु तसेच आरपीआयच्या विविध गटांशी देखील चर्चा करु. प्रकाश आंबेडकरांना 248 जागा लढवायच्या असतील तर मी त्यांच्या साेबत जाणार नाही. मी राजकारण लेफ्ट टू दी सेंटर करताे. काॅंग्रेसला 44 जागांची ऑफर देणं हे काॅंग्रेसचा अपमान करणारं आहे. काॅंग्रेसशी मैत्री करायची असेल तर अशी भाषा याेग्य नाही. त्यामुळे आंबेडकरांनी काॅंग्रेस राष्ट्रवादीशी याेग्य बाेलणी केली तर त्यांच्या साेबत राहीन असे माने यांनी सांगितले.एमआयएमचा उपयाेग झाला नाही. लाेकसभेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाचा उपयाेग झाला नाही असे माने यांनी सांगितले. त्यांचा उपयाेग झाला असता तर साेलापूरातून प्रकाश आंबेडकर निवडूण आले असते. परंतु तसे झाले नाही. असे माने यांनी सांगितले.

...तर प्रकाश आंबेडकरांनी सतरंजा उचलायला सांगितल्या तरी उचलेनप्रकाश आंबेडकर यांनी सतरंजा उचलायला सांगितल्या तरी उचलेन परंतु त्यांनी तत्त्वाशी तडजाेड करायला नकाे. त्यांनी आघाडीशी याेग्य बाेलणी केली तर त्यांच्यासाेबत राहीन. अशी भूमिका माने यांनी घेतली. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण