शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मला आता मेट्रोतच राहावं वाटतंय ! ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केली मेट्रोची सफर

By श्रीकिशन काळे | Updated: January 24, 2025 17:45 IST

आगाशे यांनी स्वत: मेट्रोचे तिकिट काढले आणि आत बसले. तेव्हा काही प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला.

पुणे : ‘‘माझं आताचं फिलिंग काय ते सांगू का ? तर मला आता मेट्रोतच राहावं वाटतंय ! एवढी छान, सुंदर, स्वच्छ मेट्रो साकारली आहे. माझ्या हयातीमध्ये मला मेट्रोने प्रवास करता आला आणि जमिनीखालूनही जाता आलं, खरोखर मला खूप आनंद होत आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते डॉ. माेहन आगाशे यांनी व्यक्त केल्या.आगाशे यांनी मेट्रोची सफर केली. तेव्हा त्यांनी मेट्रोविषयीची आपली प्रतिक्रिया दिली.त्यांना मेट्रोचा प्रवास अत्यंत आनंददायी आणि कोंडीमुक्त करता आला. कुठेही वाट पाहावी लागली नाही, तिकिटही लगेच मिळालं आणि मनमुक्त असा प्रवास झाला. मेट्रो अधिकाऱ्यांनी आगाशे यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली. कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, त्याविषयी सांगितले. आगाशे यांनी स्वत: मेट्रोचे तिकिट काढले आणि आत बसले. तेव्हा काही प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला.

आगाशे म्हणाले, मला पहिल्यांदाच सार्वजनिक वाहतूक एवढी सुंदर, स्वच्छ पहायला मिळाली. खरोखर मेट्रो एकदम सोयीस्कर आहे. आता मला कळलं की, डेक्कनला, फर्ग्युसन रोडवर गर्दी का होते ? बाहेरून आलेले सर्व लोक डेक्कनला येतात आणि केवळ खाणे, खाणे, खाणे, खाणे ! एवढंच त्यांना नाद असतो.’’अशी गंमतही त्यांनी या वेळी केली. आगाशे यांनी डेक्कन जिमखाना ते पीसीएमसी असा प्रवास केला. घर ते मेट्रोस्थानक मग मेट्रोने प्रवास करून थेट पीसीएमसी स्थानकावर गेले. मेट्रो स्थानकाहून घरी रिक्षाने गेले.

मला आता या वयात मेट्रोचा प्रवास करता आला, खरंतर २५ वर्षांपूर्वी जर ही सुविधा पुण्यात असती तर मी मेट्रोनेच प्रवास केला असता. मेट्रोने फिरलो असतो. जमिनीखालूनही प्रवास करता आला. मेट्रोमध्ये सूर्यप्रकाश देखील येतो आणि प्रवास करताना हवेशीर, सुंदर पुणे पहायला मिळते.  -डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMohan Agasheमोहन आगाशेMetroमेट्रो