शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं...'; अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 12:35 IST

उपमुख्यमंत्री पदावर असताना अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे...

पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग येत आहे. राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे गावागावांत जाऊन प्रचार करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारही मैदानात शडडू ठोकून आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही मतदारसंघात सभा घेण्यास सुरूवात केली आहे. काल (गुरुवारी) एका सभेत बोलताना अजित पवारांनी मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं, असं वक्तव्य केलं होतं. उपमुख्यमंत्री पदावर असताना अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आता बारामतीमध्ये दादागिरी करणाऱ्याचे नाव सांगा. त्याला बघतोच तो कशी दादागिरी करतो ते. सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. नानाच्या एका ओळखीच्या व्यक्तीला मोक्का लागत होता. सगळ्यांनी सांगितल्यानंतर त्याला वाचवलं. हे फक्त आतापुरतेच आहे. परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही. यापुढे कुणीच चुकीचं वागू नका, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

'सरकारने उत्तर द्यावे'-

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी कुणालाही मोक्का लागण्यापासून वाचवलं असेल तर हे धक्कादायक आहे. याबद्दल सरकारने उत्तर द्यायला हवं, असं सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक आहे. त्यांनी नेमकं कोणाला वाचवलं?, कोणत्या केसमधून वाचवलं?,आणि एवढ्या मोठ्या मोक्कामधून वाचवण्याची कारणं कोणती होती? याची माहिती द्यायला हवी आणि सोबतच सरकारनेदेखील याचं उत्तर द्यायला हवं.

हर्षवर्धन पाटील प्रकरणावरही सुळे आक्रमक-

हर्षवर्धन पाटील यांना कुणी शिव्या घातल्या तर मी ढाल बनून उभी राहीन. जर पुन्हा असं केले तर गाठ माझ्याशी आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर इथं सुप्रिया सुळेंनी सभा घेतली. त्या सभेतून त्यांनी अजित पवार गटावर जोरदार घणाघात केला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कुणीही शिवीगाळ करायची नाही. सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. जसा चढ असतो तसा उतारही असतो. माझ्या समोर बसलेली जनता उतरवेल, मला काहीही करायची गरज नाही. दमदाटी बंद करायची आहे. कुणीही आजनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्रात कुणीही आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली तर त्यांना सांगायचं आधी सुप्रिया सुळेंना धमकी दे, मग माझ्याशी बोल असंही त्यांनी बजावलं. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे