शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

माझ्यात अपयश पचवण्याची हिंमत; परत उभारी घेईन : दिलीप मोहिते-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 17:00 IST

मी परत उभारी घेईन. जिथं चुकले ते दुरुस्त करील" असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.

शेलपिंपळगाव / राजगुरूनगर : "मी हरलेलो नाही, मी पुन्हा ताठ मानेने उभा राहील, राजकारणातील यश आणि अपयश हे पचविण्याची हिम्मत दिलीप मोहितेंमध्ये आहे. मी परत उभारी घेईन. जिथं चुकले ते दुरुस्त करील" असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.राजगुरूनगर शहरात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या बालजत्रा व खाऊगल्ली जत्रेत नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेखाताई मोहिते पाटील, अनिल राक्षे, मंगल चांभारे, भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका युवक अध्यक्ष वैभव घुमटकर, शहराध्यक्ष सागर सातकर, विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संतोष भांगे, पप्पू बनसोडे, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर, माजी अध्यक्ष ॲड मनीषा टाकळकर, ॲड. सुनील वाळुंज, बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक महिला उपस्थित होते.दरम्यान, वन संरक्षणासाठी काम करणाऱ्या राजगुरूनगर येथील सपना राठोड यांना विशेष पुरस्कार देऊन माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राजगुरूनगरमध्ये नुकतीच दोन लहान चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या झाल, त्या दोन्ही चिमुकल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव घुमटकर, तर सूत्रसंचालन योगिता पाचारणे यांनी केले.कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली मध्यमवर्गीय नागरिकांना दि. ३१ डिसेंबर साजरा करता येईल असे नाही, म्हणून खाऊगल्ली आणि बालजत्रेचे आयोजन करून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात अनेक कुटुंबे सहपरिवार सहभागी झाले. खाऊगल्लीत जवळपास ६० पेक्षा जास्त स्टॉल बचतगट आणि महिलांनी उभारले. याशिवाय बालजत्रेत विविध खेळणी पाळणे, पाण्याचा तलाव होड्या, रेल्वे, लहान मुलांची खेळणी आदी चीज वस्तूचा बालचमूंनी आनंद घेतला. यातून महिलांना मोठी आर्थिक कमाई झाली. शैलेश लोखंडे यांच्या ‘अभिमान महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमात २५ महिलांना पैठणी, तर ५०० महिलांना साडीचे बक्षीस मिळाले.

मी हरलेलो नाही, मी पुन्हा ताठ मानेने उभा आहे. ज्यांनी ज्यांनी मला ताकद दिली त्या कार्यकर्त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा राहील. त्यांच्या उत्साहात कोठेही कमी पडणार नाही. पुढे अनेक निवडणुका आहेत. यात सर्वांनी भविष्याचा निर्णय घ्यावा.- दिलीप मोहिते-पाटील, माजी आमदार

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024