शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मी सत्तेसाठी हापापलेलो नाही; रोहित पवारांना दिलीप वळसे पाटलांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 15:41 IST

माझे भांडण साहेब व त्यांच्या कुटुंबांशी नाही

मंचर (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत घेतलेली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले म्हणून वळसे पाटील ओळखले जातात. त्यानंतर रोहित पवारांनी  दिलीप वळसे पाटलांचा लेखाजोखा ट्विटर वर मांडून त्यांना प्रश्न विचारला होता. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. साहेबानी तुम्हाला अजून काय द्यायला पाहिजे होत? असं रोहित पवार म्हणाले होते. त्यावर दिलीप वळसे पाटलांनी उत्तर दिले आहे. मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आज वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील चालू घडामोडी बाबत भाष्य केले. 

रोहित पवारांच्या पोस्टला उत्तर देत वळसे पाटील म्हणाले,  रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे. तुम्हाला साहेबांनी अजून काय द्यायला पाहिजे होते. साहेबांनी मला सर्व काही दिले आहे. जीवनभर मी त्यांचा कृतज्ञ राहील. रोहित यांची भेट झाली असता मतदारसंघाचा प्रश्न असेल तर मी आमदारकी सोडतो तुम्ही येथे उभे राहा. माझे भांडण साहेब व त्यांच्या कुटुंबांशी नाही. ते पुढे म्हणाले, मी सत्तेसाठी हापापलेलो नाही. तालुक्यातील जे प्रश्न शिल्लक राहिले आहेत ते सगळे सोडवायचे आहेत. आपली लढाई शरद पवार यांच्याबरोबर नाही. त्यांच्यावर रागही नाही. त्यांनी तालुक्याला भरभरून दिले आहे. कारखाना, बंधारे, बँका हे सर्व करताना ते पवार यांच्यामुळे झाले माझ्यामुळे नाही हे मी नेहमी सांगतो. 

अनेक वेळा सांगूनही त्यांनी ऐकले नाही

पवार यांची सभा असेल तर सर्वांनी जावे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. देवदत्त निकम याचे नाव न घेता निष्ठेचा प्रश्न काही लोकांनी तयार केला आहे. दहा वर्षे कारखान्याचा अध्यक्ष, सात वर्ष बाजार समितीचे सभापती, लोकसभेला तिकीट देऊनही आता वेगळी भूमिका घेतली. त्यांनी ती घेऊ नये हे माझे म्हणणे नाही. कोणाच्या डोक्यात असेल तर त्यांनी स्वतःचे नशीब आजमावे. पक्षाकडून सत्तेची पदे घेऊन प्रत्येक गावात जाऊन दुफळी गटतट  करण्याचे काम त्यांनी केले आहे. अनेक वेळा सांगूनही त्यांनी ऐकले नाही असा टोला वळसे पाटील यांनी लगावला. परिसराच्या प्रगतीसाठी काम करत राहू असे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेambegaonआंबेगावMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार