शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

Pune Ganpati Festival : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...! फुलांचा वर्षाव करत पाचही मानाच्या गणपतीचे  विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 18:13 IST

फुलांचा वर्षाव करत पाचही मानाच्या गणरायांना सायंकाळी निरोप देण्यात आला. 

पुणे - पुण्याची गणेशोत्सव मिरवणूक 'याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी गर्दी झाली. शनिवारी (दि.६ ) सकाळी मंडईत टिळक पुतळ्याजवळ मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती होऊन मिरवणुकीला सुरुवात झाली.   ढोल-ताशांचा गजर, वैभवशाली परंपरा, शिस्तबद्धता अन् 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात मानाच्या गणरायांची विसर्जन मिरवणूक शनिवारी (दि.६ ) सकाळी  सुरू झाली. फुलांचा वर्षाव करत पाचही मानाच्या गणरायांना सायंकाळी निरोप देण्यात आला. 

श्री कसबा गणपती मंडळ

श्री कसबा गणपती मंडळाच्या ‘श्रीं’ ची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सकाळी पालखीतून निघाली होती, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलधीर मोहोळ यांची उपस्थिती असणार होते. दोन ढोल-ताशा पथकांचा सहभाग, गणेशोत्सवाची माहिती देणारा विशेष रथ यांसह विविध सामाजिक संस्थांचा मिरवणुकीमध्ये सहभाग दिसून आला.  दरम्यान, कसबा गणपतीचे  मोरया मोरयाच्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. पुण्याचा मानाचा पहिला मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचे 3 वाजून 46 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले. पतंगा घाटावर गणपतिचे विसर्जन झाले.

श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ

मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची मिरवणूक दर वर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने पालखीतून  विसर्जन मिरवुकीला सुरुवात झाली. अब्दागिरी, मानचिन्हासह श्री गणराय विराजमान असलेली चांदीची पालखी कार्यकर्ते स्वत: आपल्या खांद्यावरून वाहून मिरवणुकीत सहभागी झाले. नगरावादन आणि ढोल-ताशा पथकांचे वादन करण्यात आले. दरम्यान, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे ४ वाजून ८ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.

गुरुजी तालीम गणपती मंडळमानाचा तिसरा गुरुजी तालीमचा गणपती सकाळी ‘हर हर महादेव’ या फुलांनी सजविलेल्या रथावर विराजमान झाले. स्वप्नील सरपाले, सुभाष सरपाले यांनी हा रथ साकारला आहेत. नगारा वादन आणि ढोल-ताशा पथकांचे वादन  करण्यात आले.  दरम्यान  मानाचा तिसरा  तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम गणपतीचे 4 वाजून ३ ४  मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.

तुळशीबाग महागणपती 

मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या १२५ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता वैभवशाली सांगता मिरवणुकी सुरुवात झाली. तुळशीबाग महागणपतीची मिरवणूक मयूर रथातून निघाला, मयूर रथावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. या रथामध्ये हायड्रोलिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. रथाची उंची ३५ फूट इतकी असून हा रथ १६ फूट रुंद आणि २४ फूट लांब होता मंडळाच्या १२५ व्या वर्षानिमित्त महिला व परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधू यांचा नगारा असून, ढोल-ताशा पथकेदेखील सहभागी झाले होते.  पांचाळेश्वर घाटावर मानाचा चौथा गणपती तुळशी बाग गणपती हा 4 वाजून 57 मिनिटांनी विसर्जित झाला आहे.

 केसरीवाडा गणपतीपांचाळेश्वर घाटावर मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे ५  वाजून 40 मिनिटांनी विसर्जित झाला. मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला आज (शनिवारी) सकाळी महात्मा फुले मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली. मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा, स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकांचा समावेश होता. यावेळी बिडवे बंधूंचे नगारा वादन, इतिहासप्रेमी मंडळाचा छत्रपती शिवाजी महाराज समाधी जीर्णोद्धार हा देखावा विसर्जन  मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होता.  ‘कथकली मुखवट्याच्या’ रथात प्रथेप्रमाणे गणराय पालखीत विराजमान झाले होते.  विसर्जन मिरवणुकीत केसरीवाडा गणेशोत्सव प्रमुख डॉ. रोहित टिळक, ‘केसरी’च्या विश्वस्त-व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, विश्वस्त डॉ. प्रणीत रोहित टिळक, रौनक रोहित टिळक तसेच ‘केसरी’चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ‘हरवलेला पोस्टमन’ ही स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकाची संकल्पना होती.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सव