शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकावर कमरेखालची टीका न केल्याने मताधिक्य : गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 18:33 IST

 ‘‘विरोधी उमेदवाराने माझ्यावर नको ती टीका का केली...

ठळक मुद्देगिरीश बापटांनी उलगडले मताधिक्याचे रहस्य

पुणे : ‘‘माझी ही अकरावी निवडणूक होती. प्रत्येक वेळी मतदान झाल्यानंतर मी कार्यकर्त्यांबरोबर बोलून किती मते मिळणार याचा अंदाज घेत असतो. यावेळी मताधिक्याचा माझा अंदाज ११ हजार मतांनी कमी आला,’’ असे पुण्याचे नव्याने निवडून आलेले खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.  ‘‘विरोधी उमेदवाराने माझ्यावर नको ती टीका का केली, मी मात्र कधीही कमरेखालची टीका केली नाही, त्यामुळेच मताधिक्य मिळाले,’’ या शब्दांत  बापट यांनी त्यांना मिळालेल्या विक्रमी मताधिक्याचे रहस्यही उलगडले. 

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (दि. ४) बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून आता देशाच्या सर्वोच्च सभागृहात काम करायला मिळणार असल्याचा आनंद असल्याचे बापट यांनी सांगितले. 

आगामी नियोजनाबद्दल बापट म्हणाले, की निवडणूकीआधी पुणे शहराचा म्हणून पक्षाने जाहीर केलेल्या संकल्पपत्रातील सर्व कामांसाठी कटीबद्ध आहे. मेट्रो, चांदणी चौक उड्डाणपूल अशी अनेक कामे सुरूच आहेत. आता पुणे शहराचे पाणी तसेच वाहतूक या समस्यांकडे लक्ष देणार आहे. खासदार म्हणून शहरासाठी जे करता येणे शक्य आहे ते करणार आहे, असे ते म्हणाले. भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी घेतलेल्या अविश्रांत परिश्रमांमुळेच माझा विजय शक्य झाला. महापालिकेतील पदाधिकारी सक्षम आहेत. त्यांना बरोबर घेऊन पुण्याच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आता कसबा विधानसभेतील भाजपाचा आगामी उमेदवार कोण, या प्रश्नावर बापट म्हणाले, ‘‘येत्या १५ दिवसात मी राजीनामा देईन. त्यानंतर पालकमंत्री कोणाला नियुक्त करायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. कसब्याच्या उमेदवारीसाठी आमच्याकडे माझ्यापेक्षाही चांगल्या अनेक व्यक्ती आहेत. त्यामुळे कसबा कोण लढवणार हा प्रश्नच नाही. पक्षश्रेष्ठी ते ठरवतील.’’ जिल्ह्यातल्या बारामती आणि शिरूर हे दोन मतदारसंघ भाजपाला गमवावे लागले. या संदर्भात बापट म्हणाले, की पुण्यात जसे कसबा, कोथरूड, पर्वती हे भाजपाचे बालेकिल्ले झाले आहेत, तसे बारामतीचे आहे. तो ‘त्यांचा’ बालेकिल्ला आहे. मात्र आम्ही प्रयत्न सोडणार नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मीसुद्धा उमेदवार होतो, त्यामुळे बारामतीत हवा तसा वेळ देता आला नाही, मात्र आम्ही बारामती पुन्हा लढणार व जिंकणारही.’’समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मुरलीधर मोहोळ आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्रीपदाचा राजीनामा देणार ‘‘येत्या पंधरा दिवसात पालकमंत्रीपद आणि राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. नवे पालकमंत्री कोण असतील, याची चिंता नाही. पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेतील.'' -खासदार गिरीश बापट.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटBJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल