Pune News: 'मैं शर्माजी बात कर रहा हूँ ।' म्हणत घातला गंडा, पुण्यातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Updated: December 13, 2023 19:12 IST2023-12-13T19:12:01+5:302023-12-13T19:12:22+5:30
या प्रकरणी आंबे खुर्द परिसरात राहणाऱ्या एका ५९ वर्षीय वृद्धाने मंगळवारी (दि. १२) फिर्याद दिली...

Pune News: 'मैं शर्माजी बात कर रहा हूँ ।' म्हणत घातला गंडा, पुण्यातील घटना
पुणे : अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन करून 'मैं शर्माजी बात कर रहा हूँ ।' म्हणत फसवणूक केली. हा प्रकार ७ डिसेंबर २०२३ रोजी घडला. या प्रकरणी आंबेगाव खुर्द परिसरात राहणाऱ्या एका ५९ वर्षीय वृद्धाने मंगळवारी (दि. १२) फिर्याद दिली.
अधिक माहितीनुसार, तक्रारदारांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. 'मैं शर्माजी बात कर रहा हूँ ।' चुकीने तुमच्या खात्यावर पैसे पाठवले आहेत, असे त्याने सांगितले. तक्रारदार यांना पत्नीच्या परिचयाचे शर्माजी असल्याचा गैरसमज झाला. त्यानंतर सायबर चोरट्याने पैसे क्रेडिट झाल्याचे खोटे मेसेज पाठवत तक्रारदार यांची दिशाभूल केली. तुम्हाला आलेले पैसे चुकून आले असून परत पाठवा असे सांगितले. तक्रारदार यांनी चार वेगवेगळे ट्रान्झॅक्शन करून एकूण ५४ हजार रुपये पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नराळे करत आहेत.