शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

मी राष्ट्रवादीतच ! विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपला ' दे धक्का'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 15:16 IST

Maharashtra News : विजयसिंह मोहितेपाटलांना शरद पवारांनी व्यासपीठावर आपल्या शेजारी बसवून घेतल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या..

ठळक मुद्देवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पुण्यात आयोजित विजयसिंग मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील भाजपवासी

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती झाली होती. त्यातलं एक प्रमुख नाव होतं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील. त्यावेळी विजयसिंह मोहितेपाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला राज्यात मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. मात्र, त्यांनी त्यावेळी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. मात्र त्यांनी आज ' मी राष्ट्रवादीत' च असल्याचा मोठा गौप्यस्फोट करत एकप्रकारे भाजपला 'दे धक्का' दिला आहे.    वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ व दिग्गज नेते उपस्थित आहेत. आज बुधवारी ( दि. २५) पुण्यातील या कार्यक्रमात मोहितेपाटलांना शरद पवारांनी आपल्या शेजारी बसवून घेतल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

राजकीय तर्कवितर्कांना मोठ्या प्रमाणात उधाण आले.   तो कार्यक्रम संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयसिंह मोहिते पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. त्याच रणनीतीचा भाग म्हणून माळशिरस मतदारसंघाचे विजयसिंह मोहिते पाटलांच्या सुपुत्र रणजितसिंह पाटील यांनी भविष्यातील राजकीय वारे ओळखून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय चित्र बदलले. अनपेक्षितपणे महाविकासाआघाडीचे सरकार आले. आणि अनेक नेत्यांनी आपली भूमिका सोयीस्कररीत्या बदलल्या. विजयसिंह मोहिते पाटलांनी आज पुण्यात पार पडलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या सर्व सभेनंतर ' मी राष्ट्रवादीत' च असल्याचा खुलासा केला. प्रचारादरम्यान उघड उघड जरी भाजपचा प्रचार केला नसला तरी मुलाच्या विजयासाठी आतून बरेच सूत्रे हलवल्याची चर्चा आहे. मात्र आता त्यांनी भाजपला दे धक्का देत मोठे विधान केले आहे. भाजपकडून याला कसे प्रत्युत्तर मिळते ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारBJPभाजपा