शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

"राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण राज्य सरकार अन् त्यांच्यातील वाद सोडवण्याइतका मोठा नेता नाही..!" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 21:04 IST

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यातील नाते सर्वश्रुत आहे.

पुणे : ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील नाते सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात नेहमी कुठल्या ना कुठल्या मुद्द्यांवरून खटके उडत असतात. त्यात नुकतेच कोश्यारी यांना सरकारी विमान प्रवासाला परवानगी नाकारत खाली उतरायला लागल्यामुळे हे नाते आणखीच चर्चेत आले आहे. पण त्याच दरम्यान महाविकास अगदी सरकारमधला आणि त्यात विशेष म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्याने राज्यपालांचा मी लाडका मंत्री आहे असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. तसेच राज्यातील ताज्या घडामोडींवर रोखठोक भाष्य देखील केले. सामंत यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यामधील संबंधांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना सामंत म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण खात्याचा मंत्री असल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी माझी सातत्याने संवाद घडत असतो. आणि मी त्यांचा लाडका मंत्री आहे. पण राज्य सरकार आणि कोश्यारी यांच्यातील वाद सोडवण्याइतका मोठा नेता अजिबात नाही असे मत व्यक्त केले. 

राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात तसा कोणताही वाद नाही. लोकशाहीच्या अधिकाराप्रमाणे ते राज्य सरकारला काही पत्र लिहीत असतात आणि राज्य सरकार लोकशाहीप्रमाणे त्यांना पत्र लिहून उत्तर देत असते. 

संजय राठोड समोर येऊन जनतेशी बोलतील... पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांच्या पातळीवर माहिती घेतली जात आहे. त्यामुळे आपल्याच सहकार्याबद्दल काहीतरी बोलणे योग्य ठरणार नाही. राठोड समोर येऊन जनतेशी बोलतील असे सामंत यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालतो. त्यामुळे त्यांचा आदेश मान्यच करावाच लागतो. पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेमध्ये कोणतेही गट तट नाहीत. जो आदेश देईल तो मान्य करावाच लागेल. 

टॅग्स :PuneपुणेSanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीState Governmentराज्य सरकार