शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Video: "मी बाजीराव तर माझी मस्तानी कुठाय", खासदार गिरीश बापट यांची मिश्किल टिपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 15:03 IST

पुणे - पाबळ या पीएमपी बससेवा उदघाट्नच्या निमित्ताने पुणे महापालिकेसमोरील कार्यक्रमात अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी खासदार गिरीश बापट यांचे कौतुक केले.

पुणे : पुणे - पाबळ या पीएमपी बससेवा उदघाट्नच्या निमित्ताने पुणे महापालिकेसमोरील कार्यक्रमात अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी खासदार गिरीश बापट यांचे कौतुक केले. त्यावेळी गेल्या ४० वर्षात ज्यांना कोणी हरवू शकले नाही. असे पुण्याचे बाजीराव म्हणजे गिरीश बापट आहेत असं ते म्हणाले होते. हे ऐकून बापट यांनी त्यांच्या वक्तव्यावर मिश्किल टिपणी केली आहे. 'मी बाजीराव तर माझी मस्तानी कुठाय' असे बापट म्हणाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांना याबाबत प्रसंगी पडू लागला आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. 

कार्यक्रमात गिरीश बापट यांनी माझी मस्तानी कुठाय असे विचारल्यावर पलांडे यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. ते म्हणाले, भाऊ आपण खूप मोठे आहात. पुण्यासाठी आपण अद्वितीय नेतृत्व केले आहे. आपण बाजीराव आहात पण मस्तानीबद्दल आम्हाला अजून काही माहिती मिळाली नाही. असे त्यांनी उत्तर दिले आहे. 

पीएमपीएमएल व्यवस्थापनाने पुणे ते पाबळ या मार्गावर बससेवा सुरू केली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते या मार्गावरील बससेवेचे उद्‌घाटन करण्यात आले. पुणे, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, मुखई, जातेगाव बुद्रूक, धामारी ते पाबळ या सर्वच गावांमध्ये या बससेवेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी हा विनोदी प्रसंग घडला आहे.  बापट यांचे केले कौतुक 

ज्यांच्यामुळे हे बससेवा मिळाली ते आदरणीय भाऊ गिरीश बापट आहेत. चाळीस वर्षात अनेक निवडणुका झाल्या. त्यांना कधी कोणीही हरवू शकलं नाही. असे अद्वितीय असे पुण्याचे बाजीराव कोण असतील तर ते गिरीश बापट आहेत.  

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाPMPMLपीएमपीएमएल