शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

फोन मीही लावतो, व्हिडीओ नाही करत : अजित पवार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 10:07 IST

नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

पुणे : माझ्याकडे कोणी काम घेऊन आले तर मी तातडीने फोन लावत असतो, हे सर्वांना माहीत आहे; पण मी कधी व्हिडिओ चालू केला नाही, अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली होती. यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी दिल्लीतून पूरपरिस्थितीचा आढावा घेत हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याबाबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

राज्यभरातील नगरपालिका निवडणुकांबाबत सोमवारी मुंबईत जाऊन शिवसेना तसेच काँग्रेसच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतर आघाडीची भूमिका निश्चित करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंचीच शिवसेना आहे   आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, मी काही वकिलांना विचारले, १६ जणांचा निकाल वेगळा लागला पाहिजे, असे त्यांनी सांगितले आहे. शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, असं आम्हाला वाटतं. आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू या.  

आरे कारशेडच्या निर्णयाने खर्चात वाढ शिंदे सरकारने मुंबईतील मेट्रोच्या कांजूरमार्ग येथील कारशेडचा निर्णय बदलून पुन्हा आरे येथेच कारशेड करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पवार म्हणाले की, आम्ही निर्णय घेतला तेव्हाच त्या प्रकल्पाची किंमत १० हजार कोटी रुपयांनी वाढली होती. 

त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या. उशीर झाला तर खर्चात आणखी १७ हजार कोटींनी वाढ होईल. तुमची भूमिका काहीही असली तरी जनतेच्या भल्यासाठी काय महत्त्वाचे आहे, फायद्याचे आहे, त्याच्या बाजूने निर्णय झाला पाहिजे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारPuneपुणे