शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

घरातील भांडण थेट सोशल मीडियातून आले चव्हाट्यावर  !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 10:25 IST

राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची? अशा अर्थाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. बदलत्या काळानुसार भांडणाच्या त-हा, पध्दतीत फरक पडला असून आता नवरा बायकोचे भांडण थेट वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाऊन पोहचले आहे.

 पुणे : युगंधर ताजणेराजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची? अशा अर्थाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. बदलत्या काळानुसार भांडणाच्या त-हा, पध्दतीत फरक पडला असून आता नवरा बायकोचे भांडण थेट वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाऊन पोहचले आहे. एक मेकांवर केले जाणारे आरोप, मोबाईलवर झालेल्या संभाषणाच्या क्लिप, स्क्रीन शॉट हे बिनधास्तपणे आपआपल्या फेसबुक च्या अकाऊंटवर शेयर केले जात आहे. प्रियकर - प्रियसीमधील बेवनाव देखील व्हाटसअप  ‘डीपी’तून सगळयांसमोर येऊ लागला आहे. यामुळे घरातील भांडण थेट सोशल मीडियातून चव्हाट्यावर आले आहे.    आपल्याबद्द्ल लोकांच्या मनात आपुलकी, सहानुभुती, प्रेम तयार व्हावे यासाठी सातत्यपूर्वक अनेकजण एकमेकांवर भांडणाचे उट्टे सोशल मीडियावर काढतात. याशिवाय काही केल्या स्वत:चे अस्तित्व सिध्द करणे ही दोघांकरिता अस्मितेची बाब होऊन बसत असल्याने सामाजिक माध्यमांवर पती-पत्नीबरोबरच जोडप्यांची भांडणे होत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना भगिनी हेल्पलाईनच्या प्रमुख व अ‍ॅड. सुप्रिया कोठारी यांनी सांगितले, ज्या पध्दतीने सध्या सोशल माध्यमांवर नवरा बायकोची एकमेकांची उणी-दुणी काढताना दिसतात त्यावर एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. ते म्हणजे पूर्वी नवरा असेल किंवा बायको यांना एकमेकांची माहिती काढणे तितकेसे सोपे नव्हते. सोशल माध्यमातून ती मिळवणे तुलनेने सोपे आहे. त्यामुळे अनेकदा पती पत्नी कोर्टात एकमेकांवरील आरोप सिध्द करण्याकरिता अशाप्रकारचे आरोप समाजमाध्यमांवर प्रसिध्द करतात. दुस-या बाजुला भावनिक आधार शोधण्याकरिता तसेच आपल्यांवरील अत्याचारांबाबत सहानभुती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टस फेसबुकवर शेयर करताना दिसतात.    ‘इन्स्टंट ग्रँटिफिकेशन’ मधून होतात टोकाचे आरोप घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा भंग आपल्याकडून होतो असे नवरा बायको किंवा प्रियकर प्रियसीच्या लक्षात येत नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी समोरच्याला देखील आपली मते योग्यरीत्या व्यक्त करण्याचा अधिकार सोयीस्करपणे दोघांना पडत असल्याचे चित्र सोशल माध्यमांवर पाहवयास मिळते. तसेच प्रिन्सिपल आॅफ नँचरल जस्टीस आणि राईट टू हिअर्ड नुसार दुस-या व्यक्तीचे मत विचारात घेणे जरुरीचे आहे. मात्र अनेकदा फेसबुक, व्हाटसअप, इन्स्टाग्राम, टिव्टटरवरुन एकमेकांवर आरोप करुन बदनामी करण्यात आनंद मानला जातो. आपल्याला न्याय मिळावा याकरिता कायदेशीर मार्गाने जाण्याची तयारी नसल्यानेच  ‘इन्स्टंट ग्रँटिफिकेशन’ मधून टोकाचे आरोप केले जातात. सोशल मीडियावर हल्ली मोठ्या प्रमाणात नवरा बायको यांच्यातील भांडणाचे पडसाद उमटताना दिसतात. या माध्यमांवर मुळातच सर्वांना फ्री अक्सेस असल्याने त्यावर कुणालाही आपल्या मतानुसार व्यक्त होण्यास वाव आहे. मात्र यामुळे आपण कशापध्दतीने व्यक्त होतो याचे भान पती पत्नी यांना राहत नाही. केवळ पती पत्नीच नव्हे तर प्रियकर- प्रियसी देखील  वेगवेगळया समाजमाध्यमातून भांडत आहेत. संपत चाललेली सहनशक्ती आणि तात्काळ हवे असणारे समाधान यातून रागाला मोकळी वाट करुन देण्याकरिता तरुण पिढी सोशल माध्यमांच्या आहारी जात आहेत. जी गोष्ट संवादातून मिटवली जाऊ शकते ती भांडणातून जगासमोर मांडण्याची क्रेझ वाढत चालली आहे. - अ‍ॅड. डॉ. चिन्मय भोसले (क्रिमिनल आणि सायबर लॉ तज्ञ) 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपSocial Mediaसोशल मीडियाDivorceघटस्फोटRelationship Tipsरिलेशनशिप