शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीने होमगार्डच्या पायावर घातली चारचाकी; बारामतीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 17:06 IST

नगरसेविकेच्या पतीने पोलिसांना केली शिवीगाळ

ठळक मुद्देयाप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात मास्क व वाहन तपासणी दरम्यान झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीने होमगार्डच्या पायावरून गाडी घालण्याचा प्रकार घडला आहे. शहरातील पेन्सील चौकात गुरूवारी (दि. ५) दुपारी बाराच्या दरम्यान हा प्रकार घडला. तसेच नगरसेविकेच्या पतीने धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील नगरसेविकेच्या पतीची धुलाई केली.

याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात नगरसेविकेच्या पतीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी होमगार्ड हे बारामती एमआयडीसी येथील पेन्सिल चौकात बेशिस्त वाहनांवर कारवाई करत असताना नगरसेविका पतीसह चार चाकी वाहनातून येत होत्या. चारचाकी वाहन होमगार्डच्या पायावरुन गेले. यावेळी पोलिसांनी त्या नगरसेविकेच्या पतीला गाडी थांबविण्यासाठी विनंती केली. मात्र, तरी देखील गाडी थांबवली गेली नाही. यावेळी पोलिसांनी धावत जाऊन गाडी रोखली व चौधर याला गाडीच्या बाहेर उतरण्यास सांगितले. मात्र, तो गाडीच्या बाहेर उतरायला तयार नव्हता. यावेळी पोलीस अधिकारी तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीची चावी काढून घेतली. यावेळी नगरसेविकेच्या पतीने पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली गेली. त्यानंतर पोलिसांनी देखील वर्दीचा हिसका दाखविला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

यावेळी ही घटना समाजातच नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व राष्ट्रवादीच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यावर तालुका पोलिस ठाणे ठाम राहिले. पुढील तपास बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.-------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिस