पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:09 IST2021-07-01T04:09:27+5:302021-07-01T04:09:27+5:30

पुणे : भांडणे होत असल्याच्या कारणावरून पत्नीचा गळा दाबून खून करून फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून फरार झालेल्या पतीला ...

Husband arrested for murdering wife | पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक

पुणे : भांडणे होत असल्याच्या कारणावरून पत्नीचा गळा दाबून खून करून फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून फरार झालेल्या पतीला समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी दिला.

सलीम शाकील शेख (वय ३३, रा. भवानी पेठ, मूळ उत्तर प्रदेश) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी सुमय्या यांचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पलांडे यांनी फिर्याद दिली आहे. १३ जूनला रात्री ८.३० ते १४ जून २.३०च्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी सलीम याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी मयत सुमय्या यांचा मोबाइल मिळून आलेला नाही. तो त्याने नेला आहे का, या कृत्यासाठी त्याला कोणी मदत केली आहे का? खून केल्यानंतर तो फरार होता. या कालावधीत तो कोठे होता, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.

.......

Web Title: Husband arrested for murdering wife