काळाने घाला घातला! कात्रज - कोंढवा रस्त्यावर अपघातात पतीपत्नींचा जागीच मृत्यू

By विवेक भुसे | Updated: May 12, 2023 10:13 IST2023-05-12T10:12:50+5:302023-05-12T10:13:07+5:30

आर एम डी शाळेसमोर एका भरधाव चारचाकीने त्यांना जोरात धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Husband and wife died on the spot in an accident on Katraj - Kondhwa road | काळाने घाला घातला! कात्रज - कोंढवा रस्त्यावर अपघातात पतीपत्नींचा जागीच मृत्यू

काळाने घाला घातला! कात्रज - कोंढवा रस्त्यावर अपघातात पतीपत्नींचा जागीच मृत्यू

कोंढवा : दुचाकीवरुन बाणेरवरुन कोथळे पुरंदरकडे जाणार्‍या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघा पतीपत्नीचा मृत्यु झाला.

ज्ञानेश्वर वाल्मिक लवांडे (वय ५०) त्यांची पत्नी उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय ४५, रा. कपिल मल्हार, बाणेर गाव) असे मृत्यु पावलेल्या पतीपत्नीचे नाव आहे. हा अपघात कात्रज कोंढवा रोडवरील आर एम डी शाळेसमोर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता घडला. 

याबाबत कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर लवांडे हे दुचाकीवरुन दहाव्याच्या कार्यक्रमासाठी पत्नीसह बाणेरहून कात्रज कोंढवा रोडवरुन  कोथळे पुरंदरकडे जात होते. आर एम डी शाळेसमोर एका भरधाव चारचाकीने त्यांना जोरात धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यु झाला़ अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पळून गेला. अपघाताचे वृत्त समजताच कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयाला पाठविले असून पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title: Husband and wife died on the spot in an accident on Katraj - Kondhwa road

टॅग्स :Accidentअपघात