शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नीरा नदीपात्रातील आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 20:56 IST

नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे यासाठी निरवांगी या ठिकाणच्या पात्रात आमरण उपोषणास शेतकरी बसलेले आहेत.

ठळक मुद्देआणखी तीन शेतकऱ्यांची प्रकृती खालावली, निर्णयाकडे शेतकरी आणि ग्रामस्थांचे डोळे   खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांचा संवाद

निरवांगी :  नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे, यासाठी उपोषणास बसलेल्या तीन शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे. या शेतकऱ्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आहे.श्रीरंग यशंवत रासकर, वैभव अरुण जाधव, चंद्रकांत साहेबराव फडतरे अशी त्यांची नावे आहेत. तर या पूर्वी अजिनाथ सुदाम कांबळे, शंकर शंभू होळ या शेतकऱ्यांना देखील प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचार करण्यात आले आहे. नीरा नदीचे पात्र गेले दोन ते तीन महिने पाण्यावाचून कोरडे पडलेले आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील कळंब, निमसाखर, बोराटवाडी, दगडवाडी, निरवांगी, खोरोची, चाकाटी, पिटेवाडी, निरनिमगाव, भगतवाडी, सराटी, लमुवाडी, गिरवी, वजरे व नीरानृसिंहपूर, तर माळशिरस तालुक्यातील कळंबोली, पळसमंडळ, कदमवाडी, उंबरेदहिगाव, चाकाटी, कोडबावी, आनंदनगर आदी गावांतील जनता पाण्यासाठी तहानली आहे. मागील काही महिन्यांपासून नदीच्या पात्रात पाणी नाही. जनावरांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने हाल होऊ लागले आहेत. नदीपात्रातच पाणी  नसल्याने नदीकिनारी असणाऱ्या विहिरींची पाणीपातळी प्रचंड खालावली आहे, तर काही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे यासाठी निरवांगी या ठिकाणच्या पात्रात आमरण उपोषणास शेतकरी बसलेले आहेत. या उपोषणस्थळी पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती तर सोलापूर जिल्ह्यातील  माळशिरस तालुक्यातील हजारो शेतकरी पाठिंबा देण्यासाठी दररोज येत आहेत. नदीच्या पात्रात आमरण उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नीरा नदीच्या पात्रात किनारी असलेल्या गावातील  महिला व लहान मुलांनाही पाठिंबा दिला. वयोवृद्ध आजी ही नदीच्या पात्रात येऊन धीर देत आहेत. नदीपात्रात उपोषणासाठी बसलेल्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर भ्रमणध्वनीवरून उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांचा संवाद करून दिला.

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेFarmerशेतकरी