शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

निरा नरसिंहपूर येथील संगमावर कावळ्यांची होतेय उपासमार; लॉकडाऊनमुळे सर्व धार्मिक विधी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 18:06 IST

श्री लक्ष्मी नरसिंहाच्या निरा भीमा संगमावर दररोज दशक्रिया विधी नागबळी त्रिपिंडी कालसर्प अशा अनेक पूजा होतात,परंतु लॉकडाउन असल्यामुळे सर्व धार्मिक विधी बंद

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका नीरा,भीमा नदीच्या संगमावर पक्षांनाही फटका

बाळासाहेब सुतार- निरा नरसिंहपूर : इंदापुर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपुर प्राचीन देवस्थान आहे.त्याचबरोबर हे देवस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकुटुंबाचे कुलदैवत  आहे. कोरोना व्हायरस चा फटका येथील निरा व भिमानद्यांच्या संगमावरील कावळ्याला तसेच इतरही पक्षांवर उपासमारीची वेळ आलीआहे.       श्री लक्ष्मी नरसिंहाच्या निरा भीमा संगमावर दररोज दशक्रिया विधी नागबळी त्रिपिंडी कालसर्प अशा अनेक पूजा होतात.परंतु, लॉकडाउन असल्यामुळे सर्व धार्मिक विधी बंद करण्यात आले आहे. दशक्रिया विधीमध्ये काकस्पर्शला अनन्य साधारण महत्व आहे. संगमावर होणाऱ्या विविध धार्मिक विधींवर कोरोनामुळे संक्रात आल्याने तिथून पक्षांसाठी मिळणारा रोजचा घास बंद झाला आहे. त्यात सर्वाधिक कावळ्यांची उपासमार होत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारकडून २१दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊननंतर अनेक मजूर रस्त्यावर आले. त्यासोबत गरिबांचेही जेवणाचे हाल होत आहेत. या लॉकडाऊनचा फटका आता नीरा व भीमा नदीच्या संगमावर पक्षांनाही बसत असल्याचे समोर आलेआहे.संगमावर कावळे पोटासाठी अन्न खाण्यास मिळत नाही म्हणून नरसिंहाच्या मंदिरावर वर व गावातील घराभोवती गोळा होऊन किलबिल करत असल्याचे चित्र पहावयाला मिळत आहे.   संगमाच्या ठिकाणी मोठी झाडे वृक्ष असल्याने अनेक प्रकारची पक्षी, कावळे चिमण्यांचा किलबिलाट असतो. मात्र लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून घरातुन बाहेर पडू नये, म्हणून शासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणे धोक्याचे होत आहे. या ठिकाणी कोणतीही वर्दळ नाही. कावळ्यांना पोटासाठी खाण्यास मिळत नाही. म्हणून कावळे आरडा ओरडा करायला लागले आहेत.निरा नरसिंहपुर येथील पक्षी मित्रांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन पक्षांना खाद्यवस्तू तांदूळ, बिस्किटे, भात इतर खाद्य पदार्थ उपलब्ध केले आहेत. लॉकडाऊनमध्ये तर आता आणखी  वाढ करण्यात आली आहे. हा  आता ३0 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे या लॉकडाऊनचा फटका पक्षांना बसू शकतो. यावर पशुसंवर्धन विभाग काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.---------------------

टॅग्स :Indapurइंदापूरneera bhima projectनिरा भीमा नदीजोड प्रकल्पCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस