हगणदरीमुक्तीकडे शंभर टक्के वाटचाल
By Admin | Updated: January 14, 2017 03:05 IST2017-01-14T03:05:51+5:302017-01-14T03:05:51+5:30
दौंड तालुक्याची शंभर टक्के गाव हगणदरीमुक्तीकडे वाटचाल सुरु झाली असल्याची माहिती गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी

हगणदरीमुक्तीकडे शंभर टक्के वाटचाल
दौंड : दौंड तालुक्याची शंभर टक्के गाव हगणदरीमुक्तीकडे वाटचाल सुरु झाली असल्याची माहिती गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी दिली. तालुक्यात आजपावेतो ४९ हजार ७00 स्वच्छतागृहे बांधून पूर्ण झाली आहेत तर उर्वरित १ हजार स्वच्छतागृहे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी यांचे गाव हगणदरीमुक्तीसाठी विशेष सहकार्य मिळाले. तालुक्यात ८0 ग्रामपंचायती आहेत. त्यानुसार ७१ ग्रामपंचायतअंतर्गत गावे शंभर टक्के हगणदरीमुक्त झाली आहेत. तर उर्वरित केडगाव, यवत, पारगाव, लिंगाळी, बोरीबेल, बोरीपार्धी, देवकरवाडी, गिरीम, खोर ही ९ गावे लवकरच शंभर टक्के हगणदरीमुक्त होतील असा विश्वास संतोष हराळे यांनी व्यक्त केला.
गेल्या दीड वर्षांपासून तालुक्यात गाव हगणदरीमुक्तीची मोहीम सुरु झाली. या मोहिमेंतर्गत शौचालय बांधणाऱ्यांना केंद्र व शासनाकडून १२ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त करुन दिले होते. गाव हगणदरीमुक्तीच्या प्रबोधनासाठी हलगी, शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या, ग्रामसभा, दवंडी, हलगी वाजवणे, गुडमॉर्निंग पथक इत्यादी उपक्रम राबविले होते.