शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आयटी पार्क परिसरात शेकडो बांधकाम मजूर रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ; हिंजवडी पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 00:16 IST

येथून जवळच असलेल्या एका मोठ्या बांधकाम प्रकल्पासाठी काम करणारे शेकडो परप्रांतीय मजूर आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर जमा झाले होते.

हिंजवडी : आयटीपार्क मधील माण हद्दीत असणाऱ्या एका खाजगी बांधकाम प्रकल्पावर काम करणारे शेकडो परप्रांतीय बांधकाम मजूर अचानक रस्त्यावर जमा झाल्याने एकच गोंधळ उडाला. हिंजवडी पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला. मंगळवार (दि.२८) रोजी सकाळी दहाच्या सुमारास हिंजवडी माण रस्त्यावरील बोडकेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली. येथून जवळच असलेल्या एका मोठ्या बांधकाम प्रकल्पासाठी काम करणारे शेकडो परप्रांतीय मजूर आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर जमा झाले होते.आम्हाला आमच्या मुळगावी जाऊद्या किंवा दर आठवड्याला आम्हाला वेळेवर खर्ची द्या तसेच उचल म्हणून दिलेले पैसे पगारातून कपात करु नये, कंपनी व्यवस्थापनाने पगार ठेकेदाराकडे न देता सरळ मजूरांना द्यावा अशा प्रमुख मागण्यांसाठी पाचशेहून अधिक मजूर एकत्र जमा झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक करण्यात आलेले लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे शेकडो बांधकाम मजूर आयटीपार्क परिसरात अडकून पडले आहेत. अनेक ठिकाणी संबंधीत प्रकल्प व्यवस्थापनाने मजूरांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे,  अन्नधान्य तसेच किराणामालाची सोय सुद्धा केली आहे. मात्र ठेकेदाराकडून आठवड्याला खर्ची मिळत नसल्याने कुटुंबीयांना पैसे पाठवता येत नाही.तसेच उचल म्हणून दिलेले पैसे नंतर पगारातून कपात करतील अशी भिती वाटत असल्याने आणि  सध्या सुरू असलेला लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढण्याची भीती अनेक मजूरांना वाटत असल्याने  शासनाने आम्हाला मुळगावी जाण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी शेकडो बांधकाम मजूर जमावबंदी झुगारुन एकत्र आले होते. 

जमावबंदीचा उडाला फज्जा 

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमावबंदी करण्यात आली आहे. आयटीनगरी परिसरातील ग्रामस्थांना सुद्धा विनाकारण गावाबाहेर न पडण्याचे आवाहन पोलीसांकडून  करण्यात आले आहे. मात्र आयटीपार्क मधील मुख्य रस्त्यावर शेकडो परप्रांतीय बांधकाम मजूर अचानक एकत्र जमा झाल्याने जमावबंदीचा फज्जा उडाला तसेच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने मजूरांची वेळीच समजूत काढली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. 

---------------------

मुळगावी जायचे आहे तसेच इतर काही मागण्यांसाठी काही बांधकाम मजूर एकत्र जमा झाले होते. माहिती समजाताच तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांची समजूत काढली आणि त्यांना पुन्हा आपल्या लेबर कँम्प मध्ये पाठवले आहे. - यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस