शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खाकीतील माणुसकी : पोलिसांच्या 'या' कृतीमुळे वृद्धाच्या चेहऱ्यावर फुलले हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 18:46 IST

खाकी वर्दीतील माणुसकी हरवत चालली आहे. पोलीस आणि सामान्य जनता यांच्यात अंतर पडत आहे, अशी विधाने कानावर येत असताना पुण्यात मात्र पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक होताना दिसत आहे.

पुणे :खाकी वर्दीतील माणुसकी हरवत चालली आहे. पोलीस आणि सामान्य जनता यांच्यात अंतर पडत आहे, अशी विधाने कानावर येत असताना पुण्यात मात्र पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक होताना दिसत आहे. सायकल हरवलेल्या वृद्धाची होणारी अडचण आणि गरज लक्षात घेऊन अखेर पोलीस कर्मचाऱ्यांचीच संबंधित व्यक्तीला नवी कोरी सायकल घेऊन दिली आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या चारबावडी पोलीस चौकीत काळुराम मारुती शेरे या ८० वर्षांच्या आजोबांनी सायकल हरवल्याची तक्रार नोंदवली. शेरे हे गेली अनेक वर्ष शहरातील कार्यलयांमध्ये जेवणाचे डबे पोहोचवतात. अगदी ऊन, वारा, पाऊस असला तरी लोकांच्या जेवणाची आबाळ होऊ नये त्यांची धडपड असते. मात्र दोन दिवसांपूर्वी कॅम्प भागातून त्यांची सायकल चोरीला गेली. सायकल नसल्यामुळे आता डबे कसे पोचवायचे असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. त्यामुळे ते निराश झाले होते.

अखेर त्यांची ही समस्या लक्षात घेऊन चारबावडी पोलीस चौकीतील पोलीस नाईक इम्रान मुलाणी, कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे व फाउंडेशनचे सदस्य मन्सूर शेख यांनी स्वखर्चातून नवीन सायकल खरेदी केली. आणि ती लष्कर ठाण्याच्या पोलीस  निरीक्षक(गुन्हे) माया देवरे व उपनिरीक्षक गणेश कुलाळ यांच्या हस्ते  शेरे यांना सूपूर्द केली. जुनी नाही पण नवी सायकल मिळाल्याने त्यांचा चेहरा खुलला. आणि हसऱ्या चेहऱ्याने मनापासून पोलिसांचे आभार मानत त्यांनी नव्या सायकलला टांग मारल्याचे दृश्य उपस्थितांना बघायला मिळाले. 

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे