शिक्रापूर गॅस पाइपलाइन खोदकामावेळी सापडली मानवी कवटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:17 IST2021-02-06T04:17:31+5:302021-02-06T04:17:31+5:30
याबाबत अधिक माहिती सोमशंकर बापू राठोड (रा. भोसरी गावठाण, ता. हवेली, मूळ रा. गाणगापूर ता. अकतलूर, जि. गुलबर्गा) यांनी ...

शिक्रापूर गॅस पाइपलाइन खोदकामावेळी सापडली मानवी कवटी
याबाबत अधिक माहिती सोमशंकर बापू राठोड (रा. भोसरी गावठाण, ता. हवेली, मूळ रा. गाणगापूर ता. अकतलूर, जि. गुलबर्गा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सणसवाडी गॅस पाइपलाइनचे खोदकाम सुरू असून येथे एका जेसीबीच्या साहाय्याने पाइपलाइन खोदण्याचे काम सुरू असताना जेसीबी चालकाला खड्ड्यात मानवी कवटी दिसून आली. त्यावेळी जेसीबी चालकाने पाइपाइनच्या कामावर असलेल्या अभियंत्यास ही माहिती दिली.
त्यानंतर त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली असता शिक्रापूर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत जेसीबीच्या साहाय्याने खड्ड्यात पाहणी करून पंचनामा केला असता त्यामध्ये मानवी शरीराचे काही भाग आढळून आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करीत आहेत.
--
फोटो : ०४ शक्रिापूर कवटी
फोटो.. नगर-पुणे रोड जवळ काम सुरू असताना सापडलेली मानवी कवटी.