शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

शहरात उदंड जाहले आठवडेबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 4:18 AM

शासनाच्या आदेशानुसार गेल्या दोन-अडीच वर्षांत शहराच्या विविध भागात शेतकरी आठवडेबाजार सुरू करण्यात आले आहेत.

- सुषमा नेहरकर-शिंदेपुणे - शासनाच्या आदेशानुसार गेल्या दोन-अडीच वर्षांत शहराच्या विविध भागात शेतकरी आठवडेबाजार सुरू करण्यात आले आहेत. सध्या शहरात सुरू असलेल्या ६५ ते ७० बाजारांपैकी केवळ ८ ठिकाणी महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, शासनाच्या पणन विभागाचीदेखील या शेतकरी आठवडेबाजारांना परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावी व शहरातील लोकांना ताजा भाजीपाला, फळे वाजवी दरात उपलब्ध व्होवा यासाठी शासनाने ‘संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडेबाजार’ हे खास अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अल्प दरात आपल्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेच्यावतीने शेतकरी आठवडेबाजाराचे स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले. यामध्ये शहरातील मोकळ््या जागा महापालिकेच्यावतीने आठवडेबाजारास उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले. हे धोरण ठरविताना महापालिकेच्या शाळा, मैदाने, रुग्णालयासाठी राखीव जागा बाजारासाठी न देण्याचादेखील निर्णय घेतला. त्यानुसार पणन विभागाकडून आलेल्या प्रस्तावानुसार महापालिकेच्या वतीने शहरात विविध भागांत शेतकरी आठवडेबाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येतात. गेल्या दोन-अडीच वर्षांत शहरामध्ये पणन विभागाकडून आलेल्या प्रस्तावानुसार ८ ठिकाणी शेतकरी आठवडेबाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सध्या शहरामध्ये ६५ ते ७० ठिकाणी शेतकरी आठवडेबाजार सुरू असल्याचे महापालिकेच्यावतीनेस्पष्ट केले. यात अनेक ठिकाणी परवानगी न घेता नगरसेवक, लोकप्रतिनिधींची शिफारसपत्रे घेऊन अनधिकृतपणे बाजार सुरू केल्याची माहिती समोर आली.शेतकºयांच्या नावाखाली स्थानिक विक्रेत्यांचा बाजारशेतकºयांना आपला शेतीमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा, या प्रमुख उद्देशाने शेतकरी आठवडेबाजार सुरू करण्यात आले. परंतु सध्या शहरामध्ये अनेक ठिकाणी सुरू असलेल्या शेतकरी बाजाराच्या नावाखाली स्थानिक किरकोळ विक्रेत्यांनीच बाजार उठवला असल्याचे समोर आले आहे.तसेच शेतकरी आठवडेबाजारामध्ये आठवड्यातील एक दिवस ठराविक वेळेसाठीच ही जागा उपलब्ध करून देण्यात येणार होती. परंतु आता महिन्यांच्या तीसही दिवस हे बाजार भरत आहेत.महापालिकेकडे ५४ प्रस्ताव प्रलंबितशहराच्या विविध भागांत आठवडेबाजार सुरू करण्यासाठी पणन विभागाकडून महापालिकेला आतापर्यंत ५४ प्रस्ताव सादर केले आहेत.या सर्व जागांबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मालमत्ता व बांधकाम विभागाकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे. यापैकी ३ ते ४ जागांवर बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल.शहरातील आठवडेबाजाराची लवकरच तपासणीगेल्या दोन-अडीच वर्षांत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आठवडेबाजार सुरू झाले आहेत. यापैकी बहुतेक अनधिकृत असल्याचे समोर आले असून, शहरातील सर्वच आठवडेबाजारांचा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने तपासणी करून याबाबत अहवाल तयार करून पणन विभागाला पाठविण्यात येणार आहे.- माधव जगताप, अतिक्रमण विभागप्रमुख

टॅग्स :Puneपुणे