शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेकडून निविदा कोट्यवधींच्या काम मात्र 'उणेपुरे'च : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराची 'वर्षपूर्ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 11:11 IST

पुणे महापालिकेचा पैसा 'गाळात' : सीमाभिंती, कलव्हर्टची कामे अद्यापही अपुर्णच

ठळक मुद्देसत्ताधारी आणि विरोधक केवळ गैरव्यवहाराच्या आरोप-प्रत्यारोपात मश्गूल

पुणे : अतिवृष्टीमुळे शहरात आलेल्या पुराला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात पालिकेने तातडीच्या कामांसाठी ७७ कोटींची आणि नाल्यामधील गाळ उचलण्यासाठी ८५ कोटींच्या निविदा काढल्या. कोट्यवधींच्या निविदा काढून ठेकेदारांवर खैरात केलेल्या पालिकेकडून पुरानंतर झालेले काम मात्र उणेपुरेच आहे. अद्यापही नाल्याच्या पडलेल्या भिंती तशाच आहेत. नाल्यामधील राडारोडा अनेक ठिकाणी तसाच आहे. यासोबतच नाल्यांवर छोटे पूल (कलव्हर्ट) बांधण्याची कामेही अपुर्णच आहेत.  

पूर आल्यानंतर अनेकांची घरे त्यामध्ये वाहून गेली. नाल्यालगत असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. यासोबतच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. नाल्याबाहेर असलेल्या रस्त्यांवरून तसेच सोसायटयांमध्ये जवळपास १२ ते १५ फुटांपर्यंत पाणी होते. अनेकांच्या घरात, प्रार्थनास्थळांमध्ये, दुकानांमध्ये गुडघ्याएवढा गाळ आणि कचरा जमा झाला होता. अग्निशामक दल, एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत शेकडो नागरिकांचे प्राण वाचविले होते. रस्त्यावर वाहून आलेला गाळ आणि कचरा हटविण्याचे काम अहोरात्र सुरु होते. पालिकेने त्यानंतर तातडीने कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यामधील एकही काम पुर्ण झालेले नाही. काही कामे तर सुरुच झालेली नाहीत.         सत्ताधारी आणि विरोधक केवळ गैरव्यवहाराच्या आरोप-प्रत्यारोपात मश्गूल आहेत. अंबिल ओढल्याला आलेल्या पुरामध्ये महापालिकेचे २८० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आकडा सांगितला जातो. यामध्ये सोसायट्यांच्या सीमाभिंती आणि अंबिल ओढ्याच्या सीमाभिंत, नाले, पावसाळी वाहिन्यांचा समावेश आहे. पालिकेने प्रायमुव्ह या संस्थेकडून नाल्याचे सर्वेक्षण करुन घेत पुराच्या कारणांचा शोध घेतला होता. परंतू, या संस्थेने सुचविलेल्या एकाही उपाययोजनेवर अद्याप काम झालेले नाही.           पालिका प्रशासनाने ३ किलोमीटर सीमाभिंतीसाठी ५३ कोटी आणि कलव्हर्टच्या कामासाठी २४ कोटी प्रस्तावित केले होते. कलव्हर्टच्या कामासाठी ३८ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. गैरव्यवहाराचे आरोप झाल्यामुळे ही निविदा रद्द करण्यात आली. सीमाभिंती बांधण्यासाठी काढलेल्या २० कोटींच्या निविदेमध्ये गैरव्यवहाराचा आरोप झाल्यावर याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. ======आंबील ओढा कलव्हर्टच्या निविदेत ठेकेदारांची 'रिंग'आंबील ओढ्यावरील बाधित झालेल्या २१ ठिकाणच्या कलव्हर्टच्या बांधकामाकरिता काढण्यात आलेल्या ३८ कोटी रुपयांच्या निविदेमध्ये ठेकेदारांची 'रिंग' झाल्याचे उघडकीस आले होते. अपात्र ठेकेदारांना पात्र ठरविण्याचा प्रताप सल्लागार कंपनीने केला होता. याप्रकरणी सल्लागाराला पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावरही पुढे काही होऊ शकलेले नाही. ======शहरातील सर्वाधिक १४ किलोमीटर लांबीच्या आंबिल ओढ्यामधून पालिकेने ठेकेदारामार्फ ३६ हजार ९८४ घनमीटर एवढा गाळ काढल्याचा दावा केला आहे. आंबिल ओढ्यासह शहरातील १८ बेसिनमधील पावसाळी पाण्याच्या व्यवस्थापनासाठी नाला सुधारणेची कामे करणे, कलव्हर्ट बांधणे, पावसाळी वाहिन्या टाकण्यासह अनुषंगिक कामे करण्यासाठी तब्बल ८५ कोटी ५१ लाख ५८ हजारांची निविदा काढण्यात आली होती. या निविदेमधील जी कामे झाल्याचा दावा करण्यात येत आहे.=====

प्रस्तावित कामेसीमाभिंत बांधणे : ३ किलोमिटरकलव्हर्ट बांधणे : २१ ठिकाणी

टॅग्स :PuneपुणेfloodपूरRainपाऊसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपा