शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कितीतरी मोदी येतील अन् जातील; पण मी 'मनु'वाद अन् 'मनी'वादाला घाबरणार नाही: बी.जी.कोळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 21:57 IST

आपण प्रश्न केले नाहीत तर घरात सडून मरू. प्रश्न विचारले तर ताकद निर्माण होईल..

पुणे : जात, पंथ, धर्म, नेता आपले शोषण करत आहेत. या व्यवस्थेला मोडले पाहिजे. मनुवादाला संपवले पाहिजे. पण तीच दिवसेंदिवस प्रबळ होत चालली आहे. आपले नेता आपल्याला पुढे येऊ देत नाहीत. मी पोलीस, मरणाला घाबरत नाही. कितीतरी मोदी येतील अन् जातील पण 'मनु'वाद आणि 'मनी'वादाला घाबरणार नाही. आपण सर्वजण शेवटच्या श्वासापर्यंत अन्यायाविरुद्ध लढत राहू, असे मत निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. 

पुण्यात स्वारगेट गणेश कला क्रीडा मंच येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कोळसे पाटील म्हणाले, आपण मालक होऊ शकत नाही कारण आपण संघटित नाही..ही नवी पेशवाई काय आहे? असा प्रश्न मला विचारला जातो.. 'ते' बरोबर नियोजन करतात आणि आपण भांडत बसतो. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात झेंडा फडकवणारा मोदींचा माणूस होता असा पुनरुच्चार कोळसे पाटील यांनी केला. आपण प्रश्न केले नाहीत तर घरात सडून मरू. प्रश्न विचारले तर ताकद निर्माण होईल असेही ते म्हणाले.

निवृत्त पोलीस अधिकारी एस.एम मुश्रीफ म्हणाले, एल्गार म्हणजे युद्धाचे आव्हान. हे आव्हान कुणाला आहे याबाबत स्पष्टता हवी आहे. हे युद्ध विषमतावादी ब्राह्मण व्यवस्थेविरुद्धचे आहे. ब्राह्मणी व्यवस्थेने आम्हाला कधी गांभीर्याने घेतले नाही. ब्राह्मणवादावर टीका केली तर गुन्हा दाखल होत असेल तर महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हायला हवा.कारण त्यांनी कायम ब्राह्मणवादाविरोधात लढा दिला.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीElgar morchaएल्गार मोर्चाPoliceपोलिस