लॉकडाऊनमध्ये आम्ही उदरनिर्वाह करायचा कसा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:18+5:302021-04-11T04:10:18+5:30
कान्हूरमेसाई : लॉकडाऊनमुळे आमच्यापर्यंत कोरोना येईल किंवा नाही, त्यात आम्ही राहू किंवा जाऊ याबाबत आम्हाला माहित नाही मात्र ...

लॉकडाऊनमध्ये आम्ही उदरनिर्वाह करायचा कसा ?
कान्हूरमेसाई : लॉकडाऊनमुळे आमच्यापर्यंत कोरोना येईल किंवा नाही, त्यात आम्ही राहू किंवा जाऊ याबाबत आम्हाला माहित नाही मात्र लाॅकडाऊन झाल्यावर आमचा उदरनिर्वाह कसा होईल, याच्या चिंतेने आम्हीच आधीच अर्धमेले झाले आहोत. शिवाय लॉकडाऊनचालूच राहिला तर उपासमारीनेच आमचा अंत होईल, अशी काळजी कान्हूरमेसाई व परिसरातील छोट्या व्यवसायिकांनी दिली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लादले याने त्याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या वडापाव टपऱ्या, हॉटेल, खानावळ, पानटपरी धारक, सलून व्यावसायिक यांना बसला आहे.गेल्या वर्षीच्या प्रचंड आर्थिक फटक्यातून यंदा कर्जकाढून, ठेवी मोडून व्यावसायिक तग धरू पाहत असताना पुन्हा लाॅकडाउन झाल्याने जगायचे कसे आणि उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न कान्हूरमेसाई परिसरातील व्यवसायिकांना पडला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्याची सक्त अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापारपेठ बंद झाल्याने ग्रामीण भागातील वर्दळ कमी झाली. त्यामुळे कापड दुकान, स्टेशनरी, हार्डवेअर, सराफ आधी व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांना घरी बसण्याची वेळ आली आहे. हॉटेल, खानावळ, वडापाव दुकानदार विक्री करणारे हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचा रोजगार बुडाला असून सलून देखील व्यावसायिक बंदमुळे हतबल झाले आहेत.
--
कोट१
गेली आठ-नऊ महिने आमचे धंदे बंद होते मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले आता कुठे सुरळीत धंदे सुरू झाले. पण पुन्हा करून संसर्ग वाढल्याने आमच्यावर दुकान बंद ठेवण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. आम्ही कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्वच उपाययोजना करून सलूनचा व्यवसाय करून पण आम्हाला आमचा धंदा सुरू करण्यास परवानगी द्या.
विशाल गावडे, बंटी शिंदे,
फळविक्रेते, कवठे यमाई
------
कोट २
कोरोना संसर्गामुळे महिनाभर लादलेल्या खडक निर्बंधांमुळे आमच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामधंदा बंद पडल्याने खायची काय आता शासनाने आमची उपासमारी टाळण्यासाठी रेशनिंगवरील धान्य देण्याची व्यवस्था करावी.
सुनील जाधव, कामगार
--
फोटो क्रमांक : १०कान्हूरमेसाई लॉकडाऊन काम बंद
फोटो ओळी : कवठे यमाई तालुका शिरूर येथील ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेले फळविक्रेता.