शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
2
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
3
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
5
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
6
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
7
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
8
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
9
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
10
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
11
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
12
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
13
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
14
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
15
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
16
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
17
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
18
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
19
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
20
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे

कारागृहातून सुटल्यानंतर गुंडाची कोथरूडपर्यंत मोटारींच्या ताफ्यातून मिरवणूक निघतेच कशी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 21:35 IST

‘पोलीस म्हणजे गणवेशातले सरकार असते...

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर एका गुंडाची कोथरूडपर्यंत मोटारींच्या ताफ्यातून निवडणूक निघते. ही बाब सामाजिक आरोग्यासाठी योग्य नाही. अशा कोणत्याही स्वरूपात गुन्हेगारीचे उदात्तीकरण होता कामा नये. कारण त्यांचा आदर्श तरूण पिढी घेते. पोलिसांनी असे प्रकार अजिबात खपवून घेऊ नयेत. चोर आणि गुन्ह अनोखा गारांवर पोलिसांचा वचक असलाच पाहिजे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस खात्याला सुनावले.  ‘पोलीस म्हणजे गणवेशातले सरकार असते. पोलीस सामान्यांशी कसे वागतात यावर सरकार ठरते. त्यामुळे सामान्यांवर वचक न ठेवता त्यांच्या तक्रारींचे निवारण करायला हवे असेही ते म्हणाले. 

घरफोडी, चोरी अशा गुन्ह्यात चोरट्यांकडून पुणे पोलिसांनी जप्त केलेला ऐवज तसेच मुद्देमालाचे वाटप शुक्रवारी वेगवेगळ्या गुन्ह्यातील तक्रारदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात पोलिसांनी ६० तक्रारदारांना एक कोटी २० लाख रुपयांच्या मुद्देमालाचे वाटप करण्यात आले तसेच कोरोनाच्या संसर्गात मृत्यू झालेल्या पोलिसांच्या मुलांचा अनुकंपा तत्वावर पोलीस दलात समावेश करण्यात आला असून प्रातिनिधीक स्वरुपात त्यांना पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, डॉ. जालिंदर सुपेकर, नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते. 

मध्यंतरी औंध भागात चोरांना पाहून पोलीस पळाल्याची ध्वनीचित्रफित पाहण्यात आली त्याचा दाखला देत पवार म्हणाले, या प्रकारांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळते आणि चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. पवार यांनी सामान्य नागरिकांनाही खडे बोल सुनावले. तुमचा एवढा माल चोरीला जातोच कसा? महिलांनी दागिने घालून बाहेर पडताना भान ठेवावे. बाहेरगावी सहकुटुंब जाताना सोशल मीडियावर फोटो टाकले जातात. त्यातून चोरांचे अधिकच फावते. कृपया असे करू नका. हेच पोलिसांनी शोधून काढलेले दागिने घालून पुन्हा बाहेर जाणार आणि चोरट्यांकडून ते चोरीला जाणार. हे पुन्हा घडले तर चोरांना नाही तर तुम्हाला पकडणार.अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. कायदा सुव्यवस्था उत्तम राखणे हे सर्वांचेच काम आहे असेही ते म्हणाले.-------------------------------------पुणे, मुंबईसह राज्यात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे बाधित झाले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाचा आढावा घेऊन कशी आखणी करायची यावर मार्ग काढणार आहोत. पुढील काळात काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत मी रविवारी (दि.21 ) जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.---

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार