शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्हा असणाऱ्या कैद्यांची सुटका कशी करता येईल ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 17:58 IST

युएपीआय, मोक्का प्रकरणातील आरोपींची सुटकेची मागणी : 

ठळक मुद्देज्या कैद्यांना 7 वर्षापर्यत शिक्षा ठोठावली आहे अशा कैद्यांना सोडण्याचे आदेश

पुणे : कारागृहातील कैद्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कच्च्या कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात येणार असल्याचा आदेश कारागृह प्रशासनाला दिला आहे. यासंबंधीच्या आवश्यक त्या सुचनेचे पत्र महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण विभागाला देण्यात आले आहे. गंभीर गुन्हे, मोक्का, युएपीए (दशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठीचा कायदा) , एमपीआयडी(महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा) , एनडीपीएस (अंमलीपदार्थ विरोधी कायदा) याबरोबरच आर्थिक घोटाळे, बँक आर्थिक व्यवहारातील गुन्हे यातील आरोपीना न्यायालयाच्या आदेशाचा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना देखील येरवडा कारागृहातील काही कैद्यांनी इतर कैद्यांप्रमाणे आम्हाला देखील मुक्त करावे यासाठी न्यायालयाला लेखी पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र स्टेट लीगल सर्व्हिस ऑथोरिटीच्या (महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण) वतीने राज्यातील सर्व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिरकणाचे सचिव यांना पाठवलेल्या पत्रात कुठल्या कैद्यांना सोडण्यात यावे याविषयी सूचना दिलेल्या आहेत. याविषयी अधिक माहिती देताना येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु टी पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कैद्यांच्या सुटकेसाठी हाय पावर कमिटी स्थापन करण्याचे आदेश आहेत. यात त्या कमिटीने ज्या कैद्यांना 7 वर्षापर्यत शिक्षा ठोठावली आहे. अशा कैद्यांना सोडण्याचे आदेश आहेत. त्या आदेशाची पूर्तता करण्याचे काम अनेक जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहे. आता सध्या कारागृहात गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणारे जे कैदी आहेत त्यांना देखील जामीन हवा आहे. त्यासाठी अनेक कैद्यांनी एक अर्ज कारागृह प्रशासनाकडे दिला आहे. तो अर्ज उच्च न्यायालयाला पाठवण्यात आला आहे. इतर कैद्यांना सोडण्यात येत असल्याचे पाहून आपली देखील सुटका व्हावी असे गंभीर गुन्हे करणाऱ्या कैद्यांचे म्हणणे असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. समितीने ज्या गुन्हयात ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली व ते आरोपी महाराष्ट्रात राहतात अशा आरोपींना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेशात नमूद केले आहे. सध्या येरवडा कारागृहात 7 वषार्पेक्षा शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांची संख्या साडेतीन हजारापेक्षा जास्त आहे.

*  सध्या राज्यातील 45 ठिकाणी 60 कारागृह आहे. यात 38 हजार कैदी असून यातील दोन तृतीयांश ( 12 हजार) कैदी कच्चे कैदी आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPrisonतुरुंगjailतुरुंगyerwada jailयेरवडा जेलHigh Courtउच्च न्यायालय