शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

...कशी तुझी जिरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:11 IST

उपमुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना उद्देशुन मिश्कील टीप्पणी उपमुख्यमंत्र्यांची मिश्कील टिप्पणी : पेट्रोल दरवाढीवर साधला निशाणा बारामती : ‘‘अलीकडे कोणाचाही पेट्रोल ...

उपमुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना

उद्देशुन मिश्कील टीप्पणी

उपमुख्यमंत्र्यांची मिश्कील टिप्पणी : पेट्रोल दरवाढीवर साधला निशाणा

बारामती : ‘‘अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा) फोटो लावायचाच, असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गमतीने असे म्हणतो की पेट्रोल १०० च्या पुढे गेलं की पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली. घाल आता १०० रुपयाचे पेट्रोल,’’ अशा शब्दांत मिश्कील टिप्पणी करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. त्यातच बहुतांश पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी एमआयडीसीतील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेली मिश्कील टिप्पणी चर्चेचा विषय ठरली आहे.

पवार म्हणाले, आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अनेक उत्तम प्रकारे काम करणारे पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदी साहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (मोदींचा) फोटो लावायचाच, असा नियम केला आहे. पेट्रोल भरताना त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात ‘कशी तुझी जिरवली, घाल आता १०० रुपयाचे पेट्रोल’ या पवार यांनी पंतप्रधानांना केलेल्या टिप्पणीवर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

वाढत्या इंधनदरावर सर्वसामान्य ग्राहक पेट्रोल पंपावर इंधन भरताना या ठिकाणी लावलेल्या पंतप्रधानांच्या फ्लेक्सकडे पाहत उपरोधिकपणे हात जोडल्याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मिश्कील टिप्पणी करीत दरवाढीकडे लक्ष वेधले आहे.

———————————