शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टी असताना १०० लोकं कशी आली; पुणे पालिकेची सुरक्षा काय झोपा काढत होती का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 18:42 IST

किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देण्यात आले आहेत

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी महापालिकेला सुट्टी असतानाही आत १०० लोकं कशी आली; पुणे पालिकेची सुरक्षा काय झोपा काढत होती का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. 

सोमय्यांवर झालेला हल्ला आम्ही सहजासहजी घेणार नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांना मी पत्र लिहिलं आहे की या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. पुणे पोलिसांनी तकलादू कलमं लावली असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. 

''किरीट सोमय्यांनी आजपर्यंत अनेक आरोप केले आणि ते सिद्धही झाले परंतु त्यांच्यावर हल्ला झाला नाही. याचाच अर्थ असा की, यावेळेस अशा एका व्यक्तीवर आरोप झाले ज्याला ते सहन झाले नाही. त्यामुळेच केंद्राची सुरक्षा असतानाही सोमय्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असून पोलीस याबाबत गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देण्यात आले आहेत. आता लवकरच हल्ला करणाऱ्यांना समोर आणण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले आहेत.''

किरीट सोमय्या पुन्हा पुण्यात येणार 

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये किरीटजी सोमय्या यांना दुखापत झाली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ माझ्या अध्यक्षतेखाली पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यावेळी केली त्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून ११ फेब्रुवारीला महापालिकेच्या त्याच पायरीवर सोमय्यांचे जंगी स्वागत करणार असल्याचे जगदीश मुळीक यांनी सांगितले होते. त्यामुळे किरीट सोमय्या पुन्हा पुण्यात आल्यावर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाAmit Shahअमित शाहKirit Somaiyaकिरीट सोमय्याGovernmentसरकार