गृहिणी ते उद्योगिनी, सक्षम होऊन दाखवू आम्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:10 IST2021-05-19T04:10:54+5:302021-05-19T04:10:54+5:30

प्रसिद्ध लाइफ स्किल्स तज्ज्ञ डॉ. जयश्री फडणवीस यांचे विशेष मार्गदर्शनातून गृहिणींना उद्योगजगताची माहिती मिळणार असून, गृहिणी ते उद्योगिनी कसे ...

From housewife to entrepreneur, we will be able to show | गृहिणी ते उद्योगिनी, सक्षम होऊन दाखवू आम्ही

गृहिणी ते उद्योगिनी, सक्षम होऊन दाखवू आम्ही

प्रसिद्ध लाइफ स्किल्स तज्ज्ञ डॉ. जयश्री फडणवीस यांचे विशेष मार्गदर्शनातून गृहिणींना उद्योगजगताची माहिती मिळणार असून, गृहिणी ते उद्योगिनी कसे होता येईल याचे योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. आपल्यामध्ये यशस्वी उद्योगिनी होण्याची क्षमता असून ती कशी ओळखावी, स्वतःचे आत्मपरीक्षण कसे करावे?, उद्योजकीय मानसिकता प्रत्येक्षात कशी अमलात आणावी?, गृहिणी ते यशस्वी उद्योजिका असा प्रवास करताना सकारात्मक व्यक्तिमत्त्व कसे घडवावे?, तसेच व्यवसायासाठी कम्युनिकेशन किती महत्त्वाचे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या मार्गदर्शनातून मिळणार आहेत. गृहिणीला स्वतःचा वेळ, बुद्धीचा वापर करून अवगत कलागुणांचा उपयोग करून कसे यशस्वी उद्योगिनी होता येते. हे माहिती करून घेण्यासाठी ऑनलाईन या रविवारी (दि. १९) संध्याकाळी ५ वाजता फक्त लोकमत इव्हेंटफुल पेजवर.

Web Title: From housewife to entrepreneur, we will be able to show