बहुली गावातील घरांना आग, १४ कुटुंबे उघड्यावर - शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज, शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:19+5:302021-03-15T04:11:19+5:30

उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे एका घरातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एक आजी मुलाला बोलवायला गेल्या असता ...

Houses on fire in Bahuli village, 14 families open - short circuit is expected | बहुली गावातील घरांना आग, १४ कुटुंबे उघड्यावर - शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज, शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

बहुली गावातील घरांना आग, १४ कुटुंबे उघड्यावर - शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज, शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे एका घरातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एक आजी मुलाला बोलवायला गेल्या असता जुनी घरे सलगच होती. त्यामुळे आग पटकन पसरली. घरे एकापाठोपाठ जळत गेली आणि घरे लाकडाची असल्याने सर्वत्र वेगाने पसरली. त्यात घरातील कपडे, धान्य, छत सर्व काही जळून गेले. शेतकऱ्यांच्या अंगावरील कपडे उरली असल्याने अनेकांनी टाहो फोडला. टीव्ही, फ्रिज, घरगुती पिठाची गिरणी आदी साहित्य जळून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता जगायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. संसार असा जळून गेल्याने अनेकाजण बेशुध्द झाले.

घरांमध्ये लाकडाचे सामान खूप असल्याने आग पटकन आटोक्यात आली नाही. तसेच आग विझवण्यासाठी तिथे काहीच साहित्य नसल्याने १४ घरे जळाली. या शेतकऱ्यांना आता त्वरित मदतीची गरज असून, शासकीय पातळीवर लवकर मदत मिळाली, अशी त्यांची अपेक्षा आहे.

या वेळी सरपंच सारिका रायकर, तंटामुक्ती सचिव सागर डिसले, सरपंच युवराज वांजळे, तलाठी प्रगती गायकवाड आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

-----------

बाधित शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत मिळणार असून, पंचनामा झाला आहे. ग्रामपंचायतीकडून आपत्कालीन निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

-प्रशांत शिर्के, गटविकास अधिकारी

---------------

तातडीने शेतकऱ्यांना निवाराची गरज आहे, घराचे बांधकाम सुरू करण्यासाठी बांधकाम साहित्य पुरविणार आहोत. तसेच खासदार निधीतून मदतीसाठी प्रयत्न करणार आहोत.

- सचिन दोडके, नगरसेवक

------------------

या गावा जवळील परिसरात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत असून, तातडीने अग्निशामक यंत्रणा उपलब्ध होत नाही. त्यामुळे तशी सोय परिसरात करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करणार आहोत.

- अनिता इंगळे, जिल्हा परिषद सदस्य

Web Title: Houses on fire in Bahuli village, 14 families open - short circuit is expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.