शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वीज बिल चक्क १ लाख ९१ हजार रुपये! महावितरणचा पुण्यातील एका ग्राहकाला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 11:18 IST

संबंधित विजेचे संपूर्ण बिल भरावे लागेल नाहीतर वीज जोड तोडण्यात येईल...

देहूगाव (पुणे) : येथील एका घरगुती वीज ग्राहकाला चालू महिन्याचे विजेचे बिल चक्क १ लाख ९१ हजार ३० रुपये आल्याने धक्काच बसला आहे. महावितरणकडून त्यांना संपूर्ण बिल भरावे लागेल, अन्यथा वीज जोड तोडण्यात येईल, असे सांगितल्याने ते हवालदिल झाले आहेत.

देहूगाव विठ्ठलनगर येथील काळुराम तुकाराम रासकर (वीज जोड क्रमांक १७००६४५३८९३७) यांना नोव्हेंबर महिन्याचे वीज बिल १ लाख ९१ हजार ३० रुपये आले आहे. मात्र, काळुराम रासकर यांच्या म्हणण्यानुसार मी प्रत्येक महिन्याला नियमित वीज बिल भरत आहे. त्यानंतरही मला एवढे बिल कसे आले. याबाबत त्यांनी येथील महावितरणचे सहायक अभियंता संतोष वाघमारे यांच्याकडे जाऊन बिल दाखवले असता त्यांनी म्हणणे ऐकून न घेता दाद दिली नाही तर त्यांना संबंधित विजेचे संपूर्ण बिल भरावे लागेल नाहीतर वीज जोड तोडण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे त्यांना धक्का बसला आहे. याबाबत अधिकची माहिती घेतली असता.

काळुराम रासकर यांना डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत प्रतिमहिना १०९० रुपये, एप्रिल २०२२ ते जून २०२२ पर्यंत १११० रुपये, जुलै २०२२ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत १२२० रुपये बिल आले होते. ही सर्व बिले त्यांनी भरली आहेत. मात्र, नोव्हेंबर २०२२चे बिल मात्र एकदम १ लाख ९१ हजार ३० रुपये आले. याबाबत त्यांना संबंधित अधिकारी दाद देत नाही. याबाबत येथील सहायक अभियंता संतोष वाघमारे म्हणाले की, त्यांचे बिल पाहून त्याचे विभागणी करून पाहू, एवढे बिल कसे आले आहे, याची माहिती घेऊन त्यांना टप्पे ठरवून देता येतील, असे सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरणdehuदेहू