नीरेत तारांच्या घर्षणाने एका घराला आग
By Admin | Updated: May 11, 2017 04:10 IST2017-05-11T04:10:13+5:302017-05-11T04:10:13+5:30
वीजवाहक तारांच्या घर्षणाने नीरेतील एका घराला आग लागली. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सुमारे दोन लाख

नीरेत तारांच्या घर्षणाने एका घराला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा : वीजवाहक तारांच्या घर्षणाने नीरेतील एका घराला आग लागली. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
नीरेतील प्रभाग चारमधील साई मंदिराशेजारील कौलारू चाळीतील राजेंद्र शेळके यांच्या मालकीचे घर आहे. त्यामध्ये मीनाक्षी शिवाजी भोसले या भाडोत्री राहतात. त्या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या.
दुपारी दीड वाजता घरातून धूर येत असल्याचे शेजारी राहणाऱ्या मिलिंद गायकवाड यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ज्युबीलंट लाईफ सायन्सेसच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. मंगेश कदम, सचिन कुलकर्णी व अतुल सोनवणे यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.
या वेळी पंचायत समिती सदस्य गोरखनाथ माने, ग्रामपंचायत सदस्य विजय शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस व महसूल प्रशासनाने घटनेचा पंचनामा केला असून, भोसले यांच्या घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य, भांडी, एलईडी टीव्ही, फ्रिज, मिक्सर, लाकडी शोकेस असे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान
झाले आहे.