शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये ग्लासभर पाणी सहज मिळणाऱ्यांना बाटलीबंद पाण्याची सक्ती; कोरोना नियमांच्या नावाखाली होतीये लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 14:53 IST

राजू इनामदार पुणे : ग्लासभर पाणी सहजपणे मिळणाऱ्या हॉटेलांमध्ये आता प्रत्येक ग्राहकाला बाटलीबंद पाण्याची सक्ती आहे. शहरातील साडेतीन हजारपेक्षा जास्त ...

राजू इनामदार

पुणे : ग्लासभर पाणी सहजपणे मिळणाऱ्या हॉटेलांमध्ये आता प्रत्येक ग्राहकाला बाटलीबंद पाण्याची सक्ती आहे. शहरातील साडेतीन हजारपेक्षा जास्त हॉटेलांपैकी साधारण १ हजार हॉटेलचालकांनी ग्लासमधून पाणी देणे बंदच केले आहे. यातून ३ ते ५ रुपयांची पाण्याची बाटली तब्बल १० रुपयांना विकली जात असून, त्यामधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

हॉटेलचालकांना परवानापत्र देताना अन्न व औषध प्रशासनाकडून अनेक अटी घातल्या जातात. त्यात पाणी द्यावे ही अट नाहीच. त्यामुळे हे खातेही या प्रकाराकडे लक्ष द्यायला तयार नाही. महापालिकेकडे आता हा विभागच राहिलेला नाही. ग्राहक असंघटित आहे. हॉटेलचालक कोरोनातील नियमावलींचा आधार घेत सुटे पाणी देऊ नये, या नियमाकडे बोट दाखवतात. ग्राहक असंघटित असल्याने त्याला हा अन्याय सहन करावा लागतो आहे.

काय होते नक्की

नाश्ता किंवा जेवण अथवा फक्त चहासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर लगेचच पाण्याचा ग्लास पुढे केला जात असे. आता पाणी मागितले की, वेटर पाण्याची बाटलीच थेट समोर आणून ठेवतो. ती घ्यावीच लागते. त्याचे पैसे बिलात दिले जातात. बाटली का ? अशी विचारणा केल्यानंतर वेटर ग्लासमध्ये पाणी देणे कोरोनामुळे बंद आहे असे सांगतो.

बाटलीची नक्की किंमत किती

शहराच्या आसपास व काही प्रमाणात शहरातही असे बाटलीबंद पाणी तयार करण्याचे उद्योग आहेत. त्यांच्यातील काहींकडे विचारणा केल्यानंतर एका बाटलीची किंमत ३ ते ५ रुपये पडते असे सांगण्यात आले. या बाटलीत ५०० एमएल पाणी असते. हॉटेलचालक त्याचे १० रुपये सांगतात. एवढे कसे काय विचारल्यावर स्टोअर चार्जेस असेही सांगायला कमी करत नाहीत.

काय आहे कोरोनाची नियमावली

कोरोना ऐनभरात होता, त्यावेळी टाळेबंदीच होती. मग हॉटेलमालकांच्या दबावामुळे सरकारला हॉटेल खुली ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यावेळी एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रवेश व स्टिलच्या ग्लासमधून पाणी देण्यास मनाई असे काही निर्णय घेण्यात आले. तेव्हापासून हॉटेलचालकांनी बाटलीतून पाणी विकत देण्यास सुरुवात केली. आता कोरोनाचे सगळेच निर्बंध उठवण्यात आले, हा नियम मात्र हॉटेलचालक कसोशीने पाळतात.

टॅग्स :hotelहॉटेलcorona virusकोरोना वायरस बातम्याWaterपाणीMONEYपैसा