शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

हॉस्पिटल्सची अग्निसुरक्षा वा-यावर; फायर एनओसी शोधण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 5:59 AM

शहरातील सोसायट्या आणि शाळांसह हॉस्पिटल्सलादेखील अग्नीशमनचे कवच आहे की नाही, याची माहितीच अग्नीशमन दलाला नसल्याची माहिती समोर आली आहे. हॉस्पिटल्सचा अग्नीशमनचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले की नाही, याची माहिती शोधण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर अग्नीशमन विभागाकडून देण्यात आले आहे.

पुणे : शहरातील सोसायट्या आणि शाळांसह हॉस्पिटल्सलादेखील अग्नीशमनचे कवच आहे की नाही, याची माहितीच अग्नीशमन दलाला नसल्याची माहिती समोर आली आहे. हॉस्पिटल्सचा अग्नीशमनचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले की नाही, याची माहिती शोधण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर अग्नीशमन विभागाकडून देण्यात आले आहे.राज्यातील विविध ठिकाणी अग्नीतांडवांच्या अनेक घटना अलीकडील काही महिन्यांत घडल्या आहेत. त्यात सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीबरोबरच जीवित हानी झाली आहे. महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीव संरक्षण अधिनियम २००६ अन्वये प्रत्येक शाळा महाविद्यालये, रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींना अग्नीशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. शहराचे अग्नीकवच असलेल्या अग्नीशमन दलाकडे मात्र याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने उघड केले आहे.शहरातील बोटावर मोजण्या इतक्या शाळांनादेखील अग्नीशमन यंत्रणेचे कवच नाही.अग्नीशमन यंत्रणांकडून शहरातील शेकडो शाळांपैकी अवघ्या २७ शाळांनीच अतिंम ना हरकत दाखला घेतला असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. शहरात महापालिकेच्याच २९७ शाळा आहेत.खासगी शाळांची संख्या तर कितीतरी अधिक आहे. मात्र, अग्नीशमन विभागाकडे केवळ २०१० ते २०१७ या कालावधीतील अवघ्या १४६ शाळा, महाविद्यालये आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इमारतींच्या ना हरकत प्रमाणपत्राची माहिती उपलब्ध आहे.असाच प्रकार शहरातील गृहनिर्माण सोसायटी अथवा रहिवासी इमारतींबाबत आहे. अग्नीशमन विभागाकडे शहरातील किती सोसायट्यांनी अथवा इमारतींनी अग्नीशमनचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले याची काही माहितीच नाही.किती इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले आहे याची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. उपलब्ध झाल्यास देण्यात ती देण्यात येईल, असे उत्तर अग्नीशमन विभागाकडून देण्यात आले होते.रुग्णालयांच्याबाबतही तेच ठराविक उत्तर देण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी शहरातील किती हॉस्पिटल्सला अग्नीशमनचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले, अशी माहिती विचारली होती.तसेच या ना हरकत प्रमाणपत्राच्या अटी व शर्तीची प्रत मिळावी, या शिवाय एनओसी न घेतल्याने किती हॉस्पिटल्सला नोटीसा पाठविण्यात आल्या, याची माहिती मागण्यात आली होती. या सर्व प्रश्नांना एकच उत्तर देण्यात आले आहे.‘सदरची माहिती शोधण्याचे काम सुरू आहे. माहिती उपलब्ध झाल्यास आपणास देण्यात येईल.’ अग्नीशमन दलाचे माहिती अधिकारी तथा सहायक विभागीय अधिकारी द. ना. नागलकर यांनी ही माहिती दिली आहे.

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दल