शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

माऊलींच्या अश्वांचे अंकलीतून अलंकापुरीकडे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 13:16 IST

‘श्रीं’चा मोती अश्व व जरीपटक्याचा हिरा हे मानाचे अश्व अंकली ते आळंदी असा सुमारे ३०० किलोमीटरचा हरिनाम गजरात प्रवास करून अलंकापुरीत २४ जून रोजी दाखल होतील.

ठळक मुद्देहरिनामाचा गजर : मोती आणि हिरा पालखी सोहळ्यासाठी शाही थाटात रवाना

आळंदी : माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वैभव असलेला ‘श्रीं’चा ‘मोती’ अश्व तसेच मानाचा जरीपटक्याचा ‘हिरा’ या अश्वांचे अलंकापुरीतील सोहळ्यासाठी अंकली (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) येथून श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून हरिनाम गजरात प्रस्थान झाले. ‘श्रीं’चा मोती अश्व व जरीपटक्याचा हिरा हा मानाचा अश्व अंकली ते आळंदी असा सुमारे ३०० किलोमीटरचा हरिनाम गजरात प्रवास करून अलंकापुरीत २४ जून रोजी दाखल होतील. पालखी सोहळ्याच्या वैभवात वाढ करणाऱ्या अश्वांचे प्रस्थान झाल्यानंतर अंकलीत ग्रामप्रदक्षिणा, महाप्रसाद उत्साहात झाला. अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात नऊच्या सुमारास अंबाबाई मंदिरात पूजन  व आरती करण्यात झाली.

या वेळी जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. अश्वांची श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार व महादजी राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. दिंडी व ‘श्रीं’चा अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून औक्षण केले. ‘श्रीं’चे अश्व दर्शनास भाविक, नागरिकांनी या वेळी गर्दी केली. अंकली गावातून प्रथापरंपरांचे पालन करीत पारंपरिक मार्गावरून अश्व मिरवणूक वेशीत आल्यानंतर अश्वांना नामगजरात निरोप देण्यात आला.‘श्रीं’चे अश्व प्रस्थानाप्रसंगी आळंदीहून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार, ज्ञानेश्वर गुळूंजकर, सत्यवान बवले, संजय बवले, अजित मधवे, पुणे येथून शंकर मोकाटे, विजय मोकाटे, सचिन तिकोणे, राजाभाऊ थोरात, मोरेश्वर गायकवाड, अतुल नाझरे, बसवप्रसाद जोल्ले, शिवराज जोल्ले, अश्वत्थ शितोळे सरकार, तुकाराम पाटील, संजय चौधरी, विवेक कमते यांच्यासह अंकली, जुगूळ, चंदूर, मांजरीवाडीतील भाविक, वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.श्रींच्या अश्वाला ३०० किलोमीटरचा प्रवास * रिंगण सोहळ्याचे आकर्षण असलेले ‘श्रीं’चे अश्व सुमारे ३०० किलोमीटरचा प्रवास करून आळंदीत दोन दिवस मुक्कामी राहणार आहेत. यातील दुसऱ्या दिवशी ‘श्रीं’चे पालखी सोहळ्याचे प्रस्थान २५ जून रोजी होणार आहे. ‘श्रीं’चे प्रस्थान झाल्यानंतर पुन्हा अश्वांचा आळंदी ते पंढरपूर सोहळ्यात प्रवास होणार आहे. * गेल्या १८७ वर्षांची परंपरा श्रीमंत शितोळे सरकार घराण्याने जपली आहे. याही वर्षी ही परंपरा व माऊलींची सेवा करण्यास शितोळे सरकार सज्ज झाले आहेत. या वारीतदेखील नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडणार असल्याचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांनी सांगितले.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी