शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्टंटबाजीतून दहशतीचे प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 00:34 IST

कामशेत परिसर : दुचाकी गाड्यांमधून येताहेत फटाक्यासारखे आवाज

कामशेत : शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर मोठमोठे फटाके वाजत आहेत. हे फटाके म्हणजे दुचाकी वाहनाच्या सायलेन्सरमध्ये विशिष्ट बदल करून फटाक्याच्या स्फोटसारखा आवाज काढला जात आहे. काही खोडसाळ व टवाळखोर तरुण हे प्रकार करीत आहेत.त्याचा रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनचालक, पादचारी, रुग्ण व नागरिकांना मोठा त्रास होत आहे. काही युवक पाच ते सहा दुचाक्यांवरून मुख्य रस्त्यावर स्टंटबाजी, आरडाओरडा करीत दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शहरात सध्या बुलेट व इतर स्पोर्ट्स बाईकची क्रेझ असून, तरुण पिढीतील काही उनाड व टवाळखोर मुलांकडून या वाहनांचा वेगळ्याच कारणासाठी उपयोग होत आहे. शहरात काही वर्षांपासून बुलेट व इतर मॉडिफाइड स्पोर्टस बाईकच्या सायलेन्सरमध्ये विशिष्ट बदल करून मिसफायरिंगच्या नावाखाली मोठ्या फटाक्यांच्या स्फोटाचे कानठळ्या बसणारे आवाज काढले जात असून, वाहतूक पोलिसांचे त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. या उनाड मुलांच्या दुचाकीमधून निघणाऱ्या कानठळ्या बसवणाºया आवाजाने रुग्ण त्रस्त होत आहेत. कामशेत शहर मध्यवर्ती शहर असल्याने येथे नेहमीच मोठी वर्दळ असते.भरधाव गाड्या : नागरिकांमध्ये भीतीदुचाकीवर वेगवेगळे स्टंट करणे, वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरून दुचाकी भरधाव चालवणे, पादचाऱ्यांना विशेषत: मुली-महिलांना कट मारणे आदीसह परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकाच वेळी पाच ते सहा अथवा त्यापेक्षा जास्त दुचाकी एकत्रित चालवून मोठा गोंगाट करणे आदी प्रकारांमुळे नागरिक हैराण आहेत. रस्त्यावरून जाणारे इतर वाहनचालक दचकत आहेत, तर पादचाºयांना रस्त्यावरून चालणे अवघड होत आहे. शहरातील विद्यालय, शाळा, खासगी शिकवण्या भरण्या-सुटण्याच्या वेळेत या टवाळखोर मुलांना जास्तच चेव चढत असल्याचे बोलले जात आहे. दुचाकीच्या फायरिंगमधून मोठ्याने आवाज काढून वाहन वेगात चालवणाºया या उनाड मुलांवर कारवाई कधी होणार, अशी सर्व स्तरांवरून विचारणा होत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी