शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सत्तास्थापनेनंतर पुणे महापालिकेत काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या आशा पल्लवीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 19:24 IST

सत्ता स्थापनेनंतर पुण्यात राजकीय चढ उतार

पुणे: राज्यातील सत्तास्थापनेनंतर त्यात सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन राजकीय पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सत्तेतून काही पदलाभ होण्याबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विधानसभेच्या शहरातील सर्वच म्हणजे ८ जागा भाजपाकडे होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यातील दोन जागा खेचून आणल्या, त्यामुळे त्या दोघांपैकी किमान एकाला तरी विस्तारीत मंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान द्यावे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यातही चेतन तुपे यांनी महापालिकेत व नंतर शहराध्यक्षही म्हणून चांगली कामगिरी केल्यामुळे, शहरात पक्षाला बळ मिळावे यासाठी त्यांना ही संधी द्यावी असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसनेही विधानसभेच्या तीन जागा लढवल्या होत्या. त्यातील कॅन्टोन्मेट व शिवाजीनगर या जागांवर त्यांनी चांगली लढत दिली. पक्षाकडून थोडी शक्ती मिळाली असती तर या दोन जागा जिंकता आल्या असत्या. आता तिथे पुढील निवडणूकीत तरी यश मिळावे यासाठी आत्तापासूनच पक्षाने तेथील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना पदांच्या माध्यमातून काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या दुसºया फळीतून होत आहे. सरकारी समिती किंवा महामंडळ यावर नियुक्ती मिळावी म्हणून या परिसरातील काहींनी मोर्चेबांधणीही सुरू केली असल्याचे दिसते आहे. या दोन्ही पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे विधानपरिषदेच्या जागांवरही लक्ष आहे. राष्ट्रवादीकडे ५४ तर काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. त्यांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर संधी मिळू शकते. दर दोन वर्षांनी विधानपरिषदेचे सदस्य निवृत्त होतात. काँग्रेसचे अनंत गाडगीळ व शरद रणपिसे असे पुण्यातील दोन सदस्य सध्या विधानपरिषदेत आहेत. त्यांच्या जागेवर संधी मिळावी यासाठी काँग्रेसचे पुण्यातील काही ज्येष्ठ प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीही आम्हाला आता तरी विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याची माहिती मिळाली. 

......................................................

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस