डोंगरगाव येथे कष्टकरी महिलांचा साडी देऊन सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST2021-03-13T04:19:27+5:302021-03-13T04:19:27+5:30

या वेळी सरपंच रजनी कांबळे, माजी सरपंच लता सुभाष गायकवाड, सुयश महिला बचत गटाच्या अध्यक्षा छाया गायकवाड, वृषाली ...

Honoring hard working women by giving sari at Dongargaon | डोंगरगाव येथे कष्टकरी महिलांचा साडी देऊन सन्मान

डोंगरगाव येथे कष्टकरी महिलांचा साडी देऊन सन्मान

या वेळी सरपंच रजनी कांबळे, माजी सरपंच लता सुभाष गायकवाड, सुयश महिला बचत गटाच्या अध्यक्षा छाया गायकवाड, वृषाली भाऊसाहेब भोरडे, धनलक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सारिका गायकवाड, महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा दीपाली गायकवाड, आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

त्यांना माजी सरपंच संतोष गायकवाड, कांद्याचे व्यापारी भाऊसाहेब भोरडे, आपटीचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ढगे, रविंद्र कंद, राजाराम गायकवाड, सुधीर कंद, अभिजित गव्हाणे यांनी मदत केली.

शेतावर जाऊन शेतमजूर महिलांचा सत्कार ही संकल्पना शेतकरी महिला वृषाली भाऊसाहेब भोरडे यांची होती. त्या म्हणाल्या, विविध क्षेत्रांत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होतो. दुर्गम भागात शेतावर ऊन पावसाचा विचार न करता शेत मजूर महिला कष्ट करतात. तिच्या कुटुंबाचा व शेतकऱ्यांचा ती एक आधार असते. कष्टकरी महिलांचाही सन्मान झाला पाहिजे .

सुयश महिला बचत गटाच्या अध्यक्षा छाया राजाराम गायकवाड यांनी स्वागत केले, तर संगीता भोसुरे यांनी आभार मानले.

डोंगरगाव (ता. हवेली) येथील उसाच्या फडावर जाऊन सुयश महिला बचत गटाच्या वतीन कष्टकरी महिलांचा साडी देऊन सन्मान केला.

Web Title: Honoring hard working women by giving sari at Dongargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.