संपूर्ण भारत देशातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना शौर्य भारत अवाॅर्ड २०२१ देऊन नवी दिल्ली येथील आॅनलाइन कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. दत्तात्रय जगताप हे प्राथमिक शिक्षक असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. कोरोनाच्या काळात ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी उसाच्या फडातच शाळा भरवली. बांधावर शाळा भरवणे, त्याचबरोबर स्वखर्चातून वाफेचे मशीन, सॅनिटायझर व सर्व शैक्षणिक साहित्य देणे यांसारखे अनेक उपक्रम राबविले. त्याची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याशिवाय त्यांनी लांझ्या, मनपाखरू, गुरूविण नाही व सखे गं! अशी चार पुस्तके लिहिली आहेत.
पुरस्कार मिळाल्याबद्दल जगताप यांचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, गट शिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे आदी अभिनंदन केले.
२२ टाकळी हाजी जगताप