शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

मानापमान वादात अधिकाऱ्यांची बढती रखडली

By admin | Updated: May 24, 2015 00:28 IST

सेवा ज्येष्ठता आणि नियमानुसार, महापालिकेच्या ३ अधिकाऱ्यांना विभाग प्रमुखपदी बढती मिळणार आहे.

पुणे : सेवा ज्येष्ठता आणि नियमानुसार, महापालिकेच्या ३ अधिकाऱ्यांना विभाग प्रमुखपदी बढती मिळणार आहे. मात्र, या बढतीबाबत विश्वासात न घेतल्याचे कारण पुढे करीत महापालिकेच्या राजकीय नेत्यांमध्ये मानापमान नाट्य सुरू झाल्याने त्याचा फटका या अधिकाऱ्यांना बसणार आहे. हा बढतीचा प्रस्ताव मुख्यसभेत दाखल करून घेण्यास सर्वपक्षीय गटनेत्यांनी विरोध केल्याने ही बढती रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या मोटार वाहन व कर्मशाळा विभागाकडील कार्यकारी अभियंता किशोर पोळ, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण चौधरी, अग्निशमन दलाचे उपमुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे यांची अनुक्रमे अधिक्षक अभियंता आणि मुख्य अग्निशमन अधिकारीपदी पदोन्नती करण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीमध्ये मान्य करण्यात आला आहे. या प्रस्तावांना सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर त्यांना पदोन्नती मिळणार असून वेतनवाढही होणार आहे. या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमुळे मोटार वाहन व कर्मशाळा, विद्युत विभाग आणि अग्निशमन दलाला प्रमुख अधिकारी मिळणार आहेत. दरम्यान, २ आठवड्यांपूर्वी शहर सुधारणा समितीने या बढतीला मान्यता दिल्यानंतर बुधवारी (दि.२०) रोजी झालेल्या महापालिकेच्या मुख्यसभेसमोर हा प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी आला होता. परंतु, सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेत्यांनी ऐनवेळी हे विषय दाखल करून घेण्याऐवजी जून महिन्याच्या कार्यपत्रिकेवर घेण्याची उपसूचना देऊन प्रस्ताव पुढे ढकलले आहेत. त्यामुळे या तीनही अधिकाऱ्यांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.बढतीसाठी करावी लागते राजकीय नेत्यांची मनधरणीहा बढतीचा प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी आयत्या वेळचा विषय म्हणून तो पुढे ढकलण्यात आला असला, तरी, त्यामागे मानापमान नाट्य असल्याची चर्चा महापालिकेत आहे. महापालिकेची सेवा करून सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर वरिष्ठपदी वर्णी लागणाऱ्या या अधिकाऱ्यांना आपल्याच बढतीसाठी या राजकीय नेत्यांची मनधरणी करावी लागते. हा प्रस्ताव मान्य करणे गरजेचे असताना, त्यावर आधी पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा केली जाते. त्यानंतर मुख्यसभेत त्याबाबत निर्णय घेतला जातो. त्यामुळे आपल्या हक्कासाठी या अधिकाऱ्यांना सध्या राजकीय नेत्यांची मनधरणी करावी लागत असून या बढतीबाबत पक्षनेत्यांमध्ये एकवाक्यता न झाल्याने हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा महापालिकेत आहे.