शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

कायद्याचा मान राखून गणेशोत्सव उत्साहात साजरा करा :  पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 5:21 PM

संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सजग राहावे..

ठळक मुद्देविघ्नहर्ता न्यास पारितोषिक वितरण

पुणे : ध्वनीवर्धकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांबाबत पोलिसांकडून मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यात येते़. कायद्याचा मान राखून गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा़. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सजग रहावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले़. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांची बैठक तसेच विघ्नहर्ता न्यास गणेश मंडळे पारितोषिक वितरण समारंभाचे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजन करण्यात आली होते़. यावेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक,खासदार गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल, आमदार दिलीप कांबळे, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त मितेश घट्टे, स्वप्ना गोरे आदी याप्रसंगी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ध्वनीवर्धकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निदेर्शाचे पालन करणे गरजेचे आहे. कोल्हापूरात अनेक मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीत डीजे सिस्टिमचा वापर करण्यात येत होता. कोल्हापूरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यात आले. डीजे यंत्रणेचा वापर न करणाऱ्या  मंडळांना बक्षीसे देण्यात आली. त्यानंतर अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणूकीत डीजे यंत्रणेचा वापर करण्याचे टाळले. कायद्याच्या कक्षेत राहून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सव साजरा करायला हवा. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सजग राहण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या कालावधीत रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरण्यासाठी आणखी एक दिवस वाढविण्याची विनंती केली आहे. याबाबत विचारविनिमय करण्यात येत असून प्रशासनाशी चर्चा करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. मानाच्या गणपतींना जो मान दिला जातो, तसाच पोलिसांनी दुसºया दिवशी मिरवणुकीतील इतर मंडळांनाही द्यावा़ मात्र, कार्यकर्त्यांनी कायद्याच्या कक्षेत राहून उत्सव साजरा करावा, असे आवाहन बापट यांनी केले.राम, अगरवाल, टिळक, वेंकटेशम यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. मंडळाच्या वतीने अ‍ॅड़ प्रताप परदेशी, महेश सूर्यवंशी, भाऊ करपे तसेच अन्य कार्यकत्र्यांनी सूचना मांडल्या. घट्टे यांनी सूत्रसंचलन केले. -------------------------------परवान्याची मुदत वाढविलीगणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना विविध प्रकारची परवानगी मिळवावी लागते. परवान्यासाठी महापालिकेकडून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून शकणाऱ्या मंडळांना ऑफलाइन पद्धतीने परवाने देण्यात येत असून परवाना देण्याची मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे मुक्ता टिळक यांनी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र