अनाथांसाठी कार्य करणाऱ्या ‘ज्ञानश्री’चा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST2021-02-07T04:09:53+5:302021-02-07T04:09:53+5:30

पुणे : सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या तसेच अनाथ मुलांचे शिक्षण, आरोग्य व भवितव्य घडवण्यासाठी कार्यरत स्वरगंधा व ...

Honor to 'Gyanashree' who works for orphans | अनाथांसाठी कार्य करणाऱ्या ‘ज्ञानश्री’चा सन्मान

अनाथांसाठी कार्य करणाऱ्या ‘ज्ञानश्री’चा सन्मान

पुणे : सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या तसेच अनाथ मुलांचे शिक्षण, आरोग्य व भवितव्य घडवण्यासाठी कार्यरत स्वरगंधा व ज्ञानश्री फाउंडेशनच्या जोहरभाई चुनावाला, अमर काळे व राजेंद्र दीक्षित यांचा मराठवाड्यातील साथ फाउंडेशन व प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी यशवंत भुजबळ, राजेंद्र दीक्षित, विनिता देशमुख, धनराज कदम, मीरा कदम आदी उपस्थित होते.

साथ फाउंडेशन मराठवाडा व ज्ञानश्री फाउंडेशनच्या मीरा कदम म्हणाल्या की, मी जिल्हा परिषदेला शिक्षिका म्हणून काम केले असून, पोलिओने वयाच्या १८ वर्षी दोन्ही पाय गमावले. मात्र अपंगावर मात करत जिद्दीने जीवनाचा प्रवास केला. सेवासदन वसतिगृह हिंगोली येथे आई वडील छत्र हरवलेल्या ४० मुलांचा मी सांभाळ करते. मोनिका जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Web Title: Honor to 'Gyanashree' who works for orphans