शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! प्रवाशाचे विसरलेले तीन तोळे सोने केले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 18:49 IST

रिक्षा चालकाने प्रवाशाची रिक्षात अनावधानाने राहून गेलली पर्स सांभाळून ठेवत परत केली...

नसरापूर (पुणे) : रिक्षात प्रवाशाची विसरलेली तीन तोळे ऐवजाची बॅग अवघ्या चोवीस तासाच्या आत नसरापूर (ता.भोर) राजगड पोलिसांना प्रामाणिकपणे परत करणाऱ्या रिक्षाचालकाचा सहाय्यक पोलीस निरिक्षकांनी सत्कार केला. सुनील रघुनाथ बाठे (रा. दिवळे- कपूरव्होळ) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. रिक्षा चालकाने प्रवाशाची रिक्षात अनावधानाने राहून गेलली पर्स सांभाळून ठेवत परत केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसरापूर येथील महीला प्रमिला सचिन शेटे या त्यांच्या दिवे ( सासवड) येथे माहेरच्या यात्रेसाठी मुलीसोबत गुरुवारी ( दि. १३ ) रोजी त्या एम. एच. १२ आर. टी. ७४८५ मध्ये बसून कापूरहोळ येथे उतरल्या. त्यानंतर दुसऱ्या वाहनाने सासवडपर्यंत गेल्या होत्या. त्यावेळी रिक्षाने कापूरहोळ चौकात रिक्षामध्ये बॅग विसरून गेल्या असल्याचे प्रमिला शेटे यांच्या लक्षात आले. या झालेल्या प्रकाराची माहिती पतीला सांगितली. त्यावेळी सचिन शेटे व पत्नी प्रमिला यांनी रिक्षाचालकाचा परिसरात शोध घेतला मात्र रिक्षा सापडली नाही . त्यानंतर हतबल दांपत्याने राजगड पोलीस ठाण्यात जाऊन सोन्यासह बॅग हरविल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय ढावरे, ठाणे अंमलदार मयूर निंबाळकर, गणेश कुदळे, सचिन नरुटे यांनी प्रमिला शेटे यांनी वर्णनानुसार रिक्षाचालक व रिक्षाचा शोध घेतला. त्यावेळी रिक्षाचालकाला ओळखू शकते असे पोलिसांना सांगितले होते. कापूरव्होळ येथील रिक्षा स्टॉपवर तपासकामी पाठविले होते. त्या ठिकाणी पोलिसांनी मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. दरम्यान रिक्षाचालक सुनील बाठे नेहमीप्रमाणे रिक्षा व्यवसाय करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी व्यवसायासाठी रिक्षा बाहेर काढली असता त्यांना एक बॅग आढळून आली.

रिक्षामध्ये नसरापूरमधील महिला तीन तोळे सोने असलेली व कपड्यांनी भरलेली बॅग प्रवासादरम्यान विसरल्याची लक्षात आल्यानंतर तातडीने नसरापूर येथील राजगड पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित महिलेला बॅग पुन्हा परत केली. त्यावेळी महिलेचे पती यांनी सचिन शेटे यांनी तात्काळ पोलिसांसमोर बक्षिसी देऊन प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार केला. त्यावेळी प्रामाणिक रिक्षाचालकाचे पोलिसांनी कौतुक केले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीGoldसोनंpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड