शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

घरे पुन्हा आवाक्याबाहेरच! मुद्रांक शुल्कात वाढ, बांधकाम व्यावसायिक नाराज, नगरपालिका हद्दीतील स्थिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 03:10 IST

सर्वसामान्यांना परवडेल अशा घरांच्या किमती होतील, अशी आशा दाखवलेल्या राज्य सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये पुन्हा १ टक्का वाढ केली आहे, त्यामुळे घरांच्या किमती वाढणारच आहेत. आता मुद्रांक शुल्कासह जिल्हा परिषद कर, नोंदणीशुल्क असे एकूण ७ टक्के कर आकारणी होणार आहे.

बारामती : सर्वसामान्यांना परवडेल अशा घरांच्या किमती होतील, अशी आशा दाखवलेल्या राज्य सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये पुन्हा १ टक्का वाढ केली आहे, त्यामुळे घरांच्या किमती वाढणारच आहेत. आता मुद्रांक शुल्कासह जिल्हा परिषद कर, नोंदणीशुल्क असे एकूण ७ टक्के कर आकारणी होणार आहे. त्याचबरोबर जीएसटीचे १२ टक्के देखील भरावे लागणार असल्यामुळे एकूण १९ टक्के कर ग्राहकांच्या माथी बसणार आहे. राज्य सरकारने १ टक्का मुद्रांक शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्याने ‘हेच का अच्छे दिन,’ अशी विचारणा केली जात आहे.राज्य सरकारने नगरपालिका हद्दीतील घरांवर १ टक्का मुद्रांक शुल्क वाढवले आहे. आता ग्राहकांना सर्व मिळून १९ टक्के करआकारणी होणार आहे. हा वाढलेला खर्च घरखरेदीला अडचणीचा ठरणार आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून बांधकाम व्यावसायिक अडचणीत आहेत. आर्थिक मंदीचा फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. यापूर्वी सर्व मिळून ६ टक्के करआकारणी होत. त्यामध्ये १२ टक्के जीएसटीची भर पडली. आता पुन्हा १ टक्का वाढ केल्यामुळे जवळपास १९ टक्के कराचा भूर्दंड बसणार आहे. आर्थिक मंदी असली तरी जागा, जमिनींच्या दरामध्ये तेजीच आहे. सध्या जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावले असले तरी किमती मात्र कमी झालेल्या नाहीत. मंदी असल्याचे कारण दाखवून ग्राहक कमी दराने जागांना मागणी करतो. बारामती शहर परिसरात अनेक फ्लॅट विक्रीसाठी तयार आहेत. मध्यंतरी बांधकाम व्यावसायिकांनी दरामध्ये कपात केली होती. त्यामुळे पडून असलेल्या फ्लॅटची विक्री झाली. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर मुद्रांक शुल्कामध्ये वाढ केली आहे. मागील वर्षी नोटाबंदीचाफटका मोठ्या प्रमाणात बसला होता. त्याच दरम्यान, रेरा त्यानंतर जीएसटी कर प्रणाली लागू झाली. त्याचा त्रास नागरिकांना झाला आहे. सध्या रेरामध्ये नोंदणी झालेल्यांनीच सदनिका आणि व्यापारी गाळ्यांची इमारती बांधण्याचे धाडस केले आहे.या सगळ्याचा बोजा अखेर ग्राहकांवरच...1येथील क्रेडाईचे सदस्य, देवराज कन्स्ट्रक्शनचे प्रमुख विक्रांत तांबे यांनी सांगितले, की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक दर कमी करीत आहेत. बांधकामाचा खर्चदेखील आवाक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुद्रांक शुल्क वाढल्यावर फ्लॅटचे दरदेखील वाढतात.2ग्राहकांना परवडेल, अशा किमतीने घरे देण्याचा प्रयत्न नफा कमी करून बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. मात्र, सध्या बांधकाम व्यावसायिक सरकारसाठीच काम करीत आहेत का, असा प्रश्न केला जात आहे.3कराचा भरणा वेळेत न झाल्यास पुन्हा दंडालादेखील सामोरे जावे लागते. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांवरचा बोजा वाढला आहे.करवाढीमुळे ग्राहकांना त्रास!अगोदरच अडचणीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकांना अधिक अडचण निर्माण होऊ शकते, असे बांधकाम व्यावसायिक सागर काटे यांनी सांगितले. किमती कमी केल्या तरी सरकारी शुल्क आकारणीचा भुर्दंड ग्राहकांना बसतोच. त्यामुळे बजेट वाढल्यावर घरखरेदीचा मुहूर्त ग्राहक पुढे नेतात. सरकारने काही आगाऊ माहिती नदेता १ टक्का मुद्रांक शुल्क वाढवले. निश्चितच त्याचा परिणाम होईल....तर स्वस्तात घरे कशी मिळणार ?या संदर्भात बारामतीचे बिल्डर असोसिएशनचे सदस्य, संघवी कन्स्ट्रक्शनचे संजय संघवी यांनी सांगितले, की मंदीच्या काळात ऐन दसरा, दिवाळीच्या तोंडावर करवाढ झाली आहे. एकीकडे राज्य सरकार सर्वसामान्यांना स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत, अशी भूमिका घेतात.तर दुसरीकडे करवाढ करून घरांच्या किमती वाढवतच आहेत. अचानक अशा प्रकारचे निर्णय घेऊन घरे स्वस्त होणार की महाग, याचा विचार केला पाहिजे. सरकारने ३ वर्षांत करवाढीशिवाय काहीही केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर घरांचे बजेट जात आहे.

टॅग्स :Puneपुणे