शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

पुण्यात गृहघोटाळा; २०० कोटींची फ्लॅटविक्री, 'भटक्या विमुक्त'च्या नावाखाली मिळविली जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 14:46 IST

परस्पर सदनिका विक्रीस नव्हती परवानगी....

पुणे: भटक्या विमुक्तांसाठी बांधलेल्या गृहरचना प्रकल्पातील फ्लॅट परस्पर विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. गृहप्रकल्पच लाटण्याच्या नव्या 'आदर्श'मध्ये २०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. याबाबत सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवावर गुन्हा दाखल झाला आहे.

वारजे माळवाडी येथे शासनाने भटक्या विमुक्त समाजाच्या गृहरचना प्रकल्पासाठी साडेचार एकर जमीन दिली होती. त्यावर ३९६ फ्लॅट बांधण्यात आले. त्यापैकी २१८ सभासदांना फ्लॅट न देता त्यांची परस्पर विक्री करून सुमारे २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अंबादास दत्तात्रय गोटे (वय ७०, रा. आशीर्वाद गार्डन सोसायटी, शिवणे) आणि सचिव गणेश बजरंग माने (वय ४२, रा. जोशी वाडी, शिरुर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९९० ते मार्च २०२२ दरम्यान वारजे माळवाडी येथील रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीत घडला आहे.

याप्रकरणी दीपक अशोक वेताळ (वय ४०, रा. गंधर्वनगरी, मोशी यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भटक्या विमुक्त समाजातील लोकांना घरे मिळावीत, यासाठी रामनगर सहकारी गृहरचना संस्थेची स्थापना करण्यात आली. २१८ जण सभासद होते. त्यांच्याकडून वेगवेगळ्या रकमा घेण्यात आल्या.

संस्थेला शासनाने २०१० मध्ये वारजे येथे १ हेक्टर ७६ आर. जमीन दिली. गोटे हे स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी इतरांच्या मदतीने ३९८ फ्लॅट बांधले. ते रामनगर सोसायटीच्या मूळ २१९ सभासदांना न देता इतर लोकांना शासनाच्या परवानगीशिवाय विक्री करून मूळ सभासद व शासनाची अंदाजे २०० कोटी रुपयांची फसवणूक केली.

आर्थिक गुन्हे शाखेकडे याची तक्रार आल्याने त्यांनी चौकशी केली. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल काळे तपास करत आहेत.

परस्पर सदनिका विक्रीस नव्हती परवानगी-

एका बांधकाम व्यावसायिकाकडून इमारती बांधून घेण्यात आल्या. संस्थेच्या सभासदांना हे फ्लॅट देणे अपेक्षित होते. परंतु शासनाची कोणतीही परवानगी न घेता ३९६ सदनिका बांधल्या. त्यातील केवळ १० सदनिका भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना दिल्या. उरलेल्या सदस्यांना सदनिका न देता त्यांची परस्पर विक्री केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडScam 1992स्कॅम १९९२Crime Newsगुन्हेगारी